शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:57 IST

भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

ठळक मुद्देदीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहेभाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहेकाँग्रेसच्या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहे

भोपाळ - दीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ या स्थानिक नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत, तर भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. मध्य प्रदेशमधील  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपले वचन पत्र शनिवारी प्रसिद्ध केले असून, या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या वचनपत्राला सौम्य हिंदुत्वाचा रंग दिला आहे. शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचनपत्रामध्ये चित्रकूट येथून सुरू होणाऱ्या राम पथ गमन मार्गाची राज्याच्या सीमेपर्यंत बांधणी करण्याचे आश्वासन वचनपत्रात देण्यात आले आहे. तसेच तसेच राज्याची जीवनदायिनी असलेल्या नर्मदा नदीच्या परिक्रमा मार्गावर 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहांची बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  या वचनपत्रामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात गोरक्षणासाठी करण्यात आलेल्या  विविध घोषणा होय. काँग्रेसने आपल्या वचनपत्रामधून ग्रामपंचायत स्तरावर गोशाळा उघडण्याचे आणि विशिष्ट्य भागात गोअभयारण्य तयार करण्याची घोषणा केली आहे. तसेच गोशाळेतील गोबर, खत, कंडा, गोमुत्र आणि अन्य वस्तूंचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या गाईंवर उपचार तसेच मृत गाईंवर अंत्यसंस्कार करण्याचेही आश्वासन काँग्रेसने या वचननाम्यातून दिले आहे.  दरम्यान, या वचननाम्यातून काँग्रेसने जरी सौम्य हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज्यात सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना वेसण घालण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. राज्यात सत्ता आल्यावर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. सत्ता आल्यावर राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसPoliticsराजकारणcowगाय