CoronaVirus News: कोरोनाचा कहर! पुढील चार आठवडे महत्त्वाचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:49 IST2021-04-07T05:30:05+5:302021-04-07T06:49:40+5:30
निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे.

CoronaVirus News: कोरोनाचा कहर! पुढील चार आठवडे महत्त्वाचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट गहिरे होत चालले असून, पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.
निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे. अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी भर द्यावा.
सर्व वयोगटासाठी लसीकरण तूर्तास नाहीच
सर्व वयोगटातील नागरिकांना लस दिली जावी, ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून ते योग्य नसल्याचे डॉ. पॉल आणि राजेश भूषण यांनी स्पष्ट केले.
जगात कोणत्याही देशाने सर्व वयोगटांसाठी लसीकरण खुले केलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र व दिल्ली या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व वयोगटांसाठी लसीकरण खुले करावे, अशी मागणी केली होती.
देशात रूग्णांच्या संख्येत वाढ सुरूच
कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसभरात एक लाखांचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी बाधितांची संख्या किंचित कमी झाल्याचे आढळून आले.