शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले, "मी स्वतः रुग्णालयात धुतोय कपडे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 14:29 IST

मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी चिरायू रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान, रुग्णालयात शिवराजसिंह चौहान आपले कपडे स्वतः धुवत आहे. कपडे धुण्याचा मोठा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.

मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या दरम्यान शिवराजसिंह  चौहान म्हणाले, "कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मी स्वत: माझे कपडे धूत आहे. त्याचा मला खूप फायदा झाला. फिजिओथेरपी सेशननंतर सुद्धा मी माझ्या हाताची मुठी बांधू शकत नव्हतो, कारण नुकतेच माझे ऑपरेशन झाले. पण आता ते पूर्णपणे ठीक आहे."

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. मी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन झालेलो आहे, असे त्यांनी ट्टिट केले होते. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.

याशिवाय,"मी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत: ला क्वारंटाइन राहीन आणि उपचार करून घेईन. राज्यातील जनतेने काळजी घ्यावी. थोडाशी निष्काळजीच कोरोनाला आमंत्रण देते," असेही शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट केले होते.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 47,704 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 654 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,83,157 वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात 33,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 4,96,988 लोकांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आणखी बातम्या...

राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार    

अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा     

राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित

Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार!    

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

पब्जीसह २७५ चिनी अ‍ॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत    

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानhospitalहॉस्पिटल