Corona Vaccination: १ मेपासून मेडिकलमध्ये मिळणार कोरोना लस? किती असणार किंमत?; जाणून घ्या सरकारचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:30 AM2021-04-21T09:30:25+5:302021-04-21T09:33:26+5:30

Corona Vaccination: १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होणार; लस उत्पादकांना साठा बाजारात विकण्याची परवानगी

Covid 19 Vaccines Will Not Be Sold At Pharmacies Check The Prices Of Shots | Corona Vaccination: १ मेपासून मेडिकलमध्ये मिळणार कोरोना लस? किती असणार किंमत?; जाणून घ्या सरकारचा प्लान

Corona Vaccination: १ मेपासून मेडिकलमध्ये मिळणार कोरोना लस? किती असणार किंमत?; जाणून घ्या सरकारचा प्लान

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. यामुळे १ मेपासून खुल्या बाजारात कोरोना लसींची विक्री करण्याची परवानगी कंपन्यांना मिळाली आहे. मात्र १ मेपासून कोरोनाची लस मेडिकलच्या दुकानांमध्ये मिळणार नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांना रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रांमध्येच जावं लागेल. 

कोरोनाचा कहर! देशात किती टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच लसीकरण करावं लागलं. त्यामुळे कोरोना लस मेडिकलमध्ये मिळणार नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. लस घेतल्यानंतर कोणते प्रतिकूल परिणाम होतात, साईड इफेक्ट्स जाणवतात, त्याची नोंद कोविन ऍपवर ठेवली जाते. या माहितीचा अभ्यास केला जातो. 

तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कार

कोरोना लसी बाजारपेठेत येणार? किंमत किती असणार?
कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्या एका डोसची किंमत ७०० ते १००० रुपयांच्या दरम्यान ठेऊ इच्छितात. सध्याच्या घडीला सरकारनं कोरोना लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये ठेवली आहे. खुल्या बाजारात कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस १ हजार रुपये इतकी असेल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे.

लवकरच देशात स्पुटनिक व्ही लस उपलब्ध होईल. स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं रशियन कंपनीसोबत करार केला आहे. ही लस कोवॅक्सिन आणि कोविशील्डपेक्षा जास्त प्रभावी आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत ७५० रुपये असू शकते. मात्र याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. एका इंग्रजी वृत्तपत्रानं लसींची नेमकी किंमत जाणून घेण्यासाठी उत्पादकांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी किंमत निश्चित झालं नसल्याचं सांगितलं. कंपन्यांना खासगी बाजारपेठेत किती डोस विकण्याची परवानगी देण्यात येईल, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. याबद्दलचं चित्र स्पष्ट झाल्यावर किंमत निश्चित केली जाईल, असं उत्पादकांनी सांगितलं.

Read in English

Web Title: Covid 19 Vaccines Will Not Be Sold At Pharmacies Check The Prices Of Shots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.