शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:57 IST

Corona Vaccination : लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या.

ठळक मुद्दे1 मेपासून केंद्र सरकारने 18 ते 44 वर्षांच्या लोकांना लस देण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या लसीसंदर्भात (Covid-19 Vaccine)एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक ऑनलाइन नोंदणीशिवाय देखील कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. 18 ते 44 वर्षांच्या लोकांना आता लसीकरण केंद्रातही नोंदणी करता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल. दरम्यान, 1 मेपासून केंद्र सरकारने 18 ते 44 वर्षांच्या लोकांना लस देण्यास परवानगी दिली आहे.

लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये दोन प्रकारच्या अडचणी येत होत्या. पहिली म्हणजे गावातील लोकांकडे स्मार्टफोन नव्हते, त्यांना स्लॉट बुक करण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय, अनेक राज्यांमधून अशाही बातम्या येत होत्या की, लोक स्लॉट बुकिंग करूनही लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचत नाहीत. तर अशा परिस्थितीत ही लस वाया जाणार होती, परंतु आता ही उर्वरित लस नोंदणीशिवाय आलेल्या लोकांना दिली जाणार आहे.

राज्यांना आदेशऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत. यासह मंत्रालयाने राज्यांना असेही सांगितले की, स्वाक्षरी नोंदणी दरम्यान कोणतीही गर्दी होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.

(55 सेंकदाच्या 'या' व्हिडिओमध्ये असे काय आहे, जो 5 कोटींना विकला?)

आतापर्यंत 19 कोटींहून अधिक डोसआतापर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 19.60 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सध्या बर्‍याच राज्यात लसीची कमतरता आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस दिली जात नाही.

भारतात सध्या तीन लससध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकद्वारे बनविलेली कोव्हॅक्सिन लस नागरिकांना देण्यात येत आहे. याशिवाय, रशियाचा स्पुतनिक-व्ही काही राज्यांमध्येही उपलब्ध आहे.

"घरीच कोरोना टेस्ट करणाऱ्या CoviSelf किटचे उत्पादन वाढणार, दर आठवड्याला तयार होणार 10 कोटी युनिट्स"पुढील काही महिन्यांत मागणीनुसार होम-बेस्ड कोरोना टेस्ट किटच्या आठवड्यातून दहा कोटी युनिट उत्पादन करण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे, असे भारतीय डायग्नोस्टिक्स कंपनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने (मायलॅब) शुक्रवारी म्हटले आहे. मायलॅबचे सीईओ राहुल पाटील म्हणाले की, 'कंपन्याद्वारे निर्मित टेस्ट किटमध्ये सरकारी संस्था आणि कंपन्यांनी रस दाखविला आहे. कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय कोणताही व्यक्ती कोरोनाची टेस्ट करु शकते आणि हे खेड्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.'

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य