जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम १६ जानेवारीपासून भारतात सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचं राज्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही राज्यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचं लसीकरण तुर्तास थांबवून ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या परिस्थितीत नीति आयोगाकडून गुरूवारी मोठं वक्तव्य आलं आहे. आता एफडीए आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणतीही लस भारतात आणली जाऊ शकते, असं नीति आयोगाकडून सांगण्यात आलं. तसंच १ ते २ दिवसांच्या आत आयात परवाना दिला जाईल. सध्या कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली. "डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी सोबत अन्य विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय सातत्यानं फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या संपर्कात आहे," असं पॉल म्हणाले. ते लसींचे डोस निर्यात करतील का किंवा भारतात त्याचं उत्पादन करतील असं त्यांना विचारण्यात आलं आहे. या तिन्ही कंपमन्या जुले ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीपर्यंत लस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Covid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 18:40 IST
Covid 19 Vaccine : FDA आणि WHO नं मंजुरी दिलेल्या लसीला भारतात आयातीसीठी १-२ दिवसात इम्पोर्ट लायसन्स मिळणार.
Covid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा
ठळक मुद्देFDA आणि WHO नं मंजुरी दिलेल्या लसीला भारतात आयातीलाठी १-२ दिवसात इम्पोर्ट लायसन्स मिळणार.देशातील लसींची कमतरता दूर होण्यास मिळणार मोठी मदत.