शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

EPFO: कोरोना संकट, त्यात महागाईने आर्थिक तंगी; PF चे पैसे असे काढा, एका झटक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:12 IST

देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरूच आहे. अजूनही रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापासून दिलासा देण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरूच आहे. अजूनही रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापासून दिलासा देण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि उपचाराची गरज असेल तर तो सरकारी मदत घेऊ शकतो. ही मदत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचाऱ्यांना देत आहे. उपचाराच्या खर्चासाठी EPFO ​​कडून आगाऊ स्वरूपात आर्थिक मदत घेतली जाऊ शकते. सरकारने कोविड-19 ला देशव्यापी महामारी घोषीत केल्यामुळे, देशभरातील कंपन्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या EPF योजनेच्या सदस्यांना आगाऊ रक्कम मिळण्याचा अधिकार आहे.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही आगाऊ रक्कम घेण्यासाठी ईपीएफ सदस्य किंवा त्याच्या कंपनीला कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. या अंतर्गत, तुम्ही तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा EPF खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 75%, यापैकी जे कमी असेल ते परत करण्यायोग्य काढू शकता. 

किती पैसे मिळवू शकता?EPF मधून किती पैसे घेता येतील? हे एका उदाहरणाने समजून घ्या. जर आज सदस्याच्या EPF खात्यात 50,000 रुपये जमा आहेत आणि सदस्याचे मासिक मूळ वेतन व महागाई भत्ता 15,000 रुपये असेल, तर 50,000 रुपयांच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्के रक्कम 37,500 रुपये इतकी होते. यानंतर तीन महिन्यांच्या पगाराची रक्कम ४५ हजार रुपये झाली. अशाप्रकारे 37,500 रुपये जे दोन्ही रकमेपेक्षा कमी आहेत, मग 37,500 रुपये सभासदाला आगाऊ रक्कम म्हणून काढता येऊ शकते. ही रक्कम कोरोनाच्या उपचारात वापरली जाऊ शकते.

आता आगाऊ रक्कम घेण्यासाठी ऑनलाइन दावा कुठे आणि कसा दाखल करता येईल ते जाणून घेऊयात. यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होमपेजवर Covid-19 टॅब अंतर्गत सूचना देण्यात आल्या आहेत. या विभागात जाऊन तुम्ही आगाऊ अर्ज करू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊयात...

१. युनिफाइड पोर्टलच्या सदस्य इंटरफेसवर लॉग इन कराhttps://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface

२. ऑनलाइन सेवेवर क्लिक करा, दावा (फॉर्म 31,19,10C आणि 10D पाहा)

३. तुमच्या बँक खात्याचे शेवटचे ४ अंक प्रविष्ट करा आणि पडताळणी करा.

४. Processed for Online Claim वर क्लिक करा

५. ड्रॉप डाउनमध्ये पीएफ अॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31)

६. ड्रॉपडाऊनमधून purpose म्हणून  Outbreak of pandemic (Covid-19)  निवडा 

७. आवश्यक रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि तुमचा पत्ता प्रविष्ट करा.

८. Get Aadhaar वर क्लिक करा

९. आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका

१०. तुमचा दावा नोंदवला जाईल. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीcorona virusकोरोना वायरस बातम्या