COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 01:04 PM2021-07-17T13:04:10+5:302021-07-17T13:07:25+5:30

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत.

covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india | COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

Next

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार नागरिकांनी अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. जगात अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यानं धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. जगात कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यात भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जगातील एकंदर ट्रेंड पाहता पुढील १०० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचं मानले जात आहेत. (covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india)

जगातील कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ
देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी जगात अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही धोक्याची घंटा ठरू शकते. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता या आठवड्यात ३३.७६ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हीच संख्या २९.२२ लाख इतकी होती. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहिला तर लक्षात येतं की रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी येणाऱ्या संकटाची चाहूल तर ठरताना दिसत आहे. स्पेनमध्ये सध्या कोरोनानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनमध्ये एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर नेदरलँडमध्ये जवळपास ३०० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारतात कोरोना रुग्णसंख्येतील घट धीम्या गतीनं
दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलँडमध्ये कोरोना रुग्णसंख्येच अचानक वाढ होताना दिसून येत आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी आधीच्या तुलनेत रुग्णघटीचा वेग अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे भारतावरही तिसऱ्या लाटेच्या संकटाची टांगती तलवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा नागरिकांना तिसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क केलेलं आहे. 

८ टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरण
देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरू होऊन काहीच महिने उलटले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यात देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ ८ टक्के लोकांचंच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य कसं पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ४० कोटी नागरिकांचच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग पाहता तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत जात आहे. 

Web Title: covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.