शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 15:25 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत होता. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेली पाहायला मिळत होती. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सलग पाचव्या दिवशी 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट असल्याची माहिती मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41, 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 541 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्ण ठीक होण्याच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.36 टक्के आहे. कोरोनाचे हे वाढणारे आकडे भीतीदायक आहेत. केरळमधून गेल्या काही दिवसांत दररोज 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक असलेल्या राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ICMR चे डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांहून अधिक आहे. तर 53 जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के आहे. या जिल्ह्यांमधील लोकांची निष्काळजीपणा हा घातक ठरू शकतो. पाच राज्यामध्ये 80.36 टक्के नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 49.3 टक्के केस या केरळमधील आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे. गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपोर्टनुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू