शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

मंदिराच्या हत्तीणीला दयामरण देण्यास मुभा, न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 6:04 AM

सालेम येथील मंदिरातील अनेक वर्षे आजारी असलेल्या आणि स्वत:हून उभेही राहता येत नसलेल्या राजेश्वरी या हत्तीणीला असह्य यातनांमधून मुक्तीसाठी दयामरण देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त परवानगी दिली. प्राण्यांच्या दयामरणाचा भारतातील हा बहुदा पहिलाच आदेश आहे.

चेन्नई : सालेम येथील मंदिरातील अनेक वर्षे आजारी असलेल्या आणि स्वत:हून उभेही राहता येत नसलेल्या राजेश्वरी या हत्तीणीला असह्य यातनांमधून मुक्तीसाठी दयामरण देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त परवानगी दिली. प्राण्यांच्या दयामरणाचा भारतातील हा बहुदा पहिलाच आदेश आहे.‘इंडियन सेंटर फॉर अ‍ॅनिमल राइट््स अ‍ॅण्ड एज्युकेशन’ या संघटनेचे संस्थापक एस. मुरलीधरन यांच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. अब्दुल कुद्दुस यांनी हा निकाल दिला. (वृत्तसंस्था)चारही पाय निकामी, शरीरावर खोल जखमा- राजेश्वरी ही सालेम येथील अरुलमिगु सुगणेश्वर मंदिरातील हत्तीण आहे. मागचा डावा पाय लुळा झाल्याने गेली १० वर्षे ती तीन पायांवरच उभी राहात होती. अतिभार पडून संधीवात झाल्याने तिचे बाकीचे तीन पायही अधू झाले. त्यानंतर राजेश्वरी एका कुशीला कलंडून पडून राहू लागली.तिच्या शरीरावर मोठ्या, खोल जखमा झाल्या व त्यात कीडे झाले. जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत सोंडेने घासही घेता येत नसल्याने तिचे खाणेपिणेही अलीकडच्या काळात बंद झाले.मध्यंतरी राजेश्वरीला उठून बसवून तिची कूस बदलण्यासाठी डॉक्टरांनी जेसीबीच्या साह्याने तिला उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीमधून ती उंचावरून खाली पडली आणि तिला आणखी दुखापत झाली.- औषधोपचारांनी राजेश्वरी बरी होणार नाही व अशा ्वस्तेत तिला जगविणे म्हणजे तिला अधिक यातना देणे ठरेल, असे प्रमाणपत्र जनावरांच्या डॉक्टरांनी दिले तर या हत्तीणीला दयामरण दिले जावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

टॅग्स :Courtन्यायालय