शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांबाबत कोर्टाचे आदेश पाळणार

By admin | Updated: March 4, 2016 02:35 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांच्या सुटकेप्रकरणी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करील, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांच्या सुटकेप्रकरणी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करील, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, आरोपींच्या सुटकेसंदर्भात तामिळनाडू सरकारचे पत्र कालच मिळाले असून, सरकार त्यावर विचार करीत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे आणि तो मानणे ही सरकारची घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी आहे.तत्पूर्वी काँग्रेस सदस्यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याबाबत तामिळनाडू सरकारच्या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला आणि कें द्राने मारेकऱ्यांच्या सुटकेला कदापि परवानगी देऊ नये अशी मागणी केली. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला, तेव्हा तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुकचे सदस्यही त्यांच्या विरोधात हौद्यात उतरले. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी दिली. तामिळनाडू सरकारने गृहमंत्र्यांना पत्र लिहून राजीव गांधी हत्याकांडातील दोषींच्या सुटकेची केलेली मागणी अत्यंत दुर्दैवी आहे. माजी पंतप्रधानांनी देशासाठी बलिदान दिले असून, त्यांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भावना व्यक्त करतानाच हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यास भविष्यात इतर राज्यांमधूनही अशा मागण्या येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा खरगे यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)