समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:26 IST2025-10-18T09:23:18+5:302025-10-18T09:26:46+5:30
न्यायालयाने ही याचिका शुक्रवारी फेटाळून लावली.

समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
नवी दिल्ली : आर्यन खानला अटक केल्यामुळे प्रकाशझोतात आलेले समीर वानखेडे यांना मोठा दिलासा देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्र सरकारने वानखेडे यांच्या पदोन्नतीला विरोध करणारी पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका शुक्रवारी फेटाळून लावली.
सरकारने माहिती लपविली
वानखेडे यांना कधीही निलंबित करण्यात आले नाही किंवा त्यांच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.
‘कॅट’ने ऑगस्ट २०२४ मध्ये वानखेडे यांच्याविरुद्ध विभागीय कारवाईला स्थगितीही दिली होती. ही सर्व माहिती सरकारने लपविली, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोत असताना शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.