शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी १२ मार्चला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:39 IST

शौर्य पाटील याने शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून छळ झाल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहीत आत्महत्या केली होती

सांगली : शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी न्यायालयानेदिल्लीपोलिसांना नोटीस बजावत प्रकरणाचा स्थिती अहवाल मागितला. पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार असून, त्यावेळी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. शौर्यचे कुटुंबीय मूळचे खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील आहेत. त्यामुळे याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले होते.शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या आत्महत्येची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील संजय लाउ यांनी सांगितले की, जर शौर्यचे पालक पोलिसांच्या तपासावर असमाधानी असतील तर ते प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यास तयार आहेत.

वाचा- शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, शाळेवर कारवाईची खासदार विशाल पाटील यांची मागणीप्रदीप पाटील यांच्यावतीने वकील प्रितीश सभरवाल यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यास चार तासांचा विलंब झाला आणि पोलिसांनी शौर्यच्या पालकांना या प्रकरणात शाळेचे नाव समाविष्ट करू नये, असे सांगितले होते. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.सुनावणीदरम्यान पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. त्या फुटेजनुसार शाळेवर केलेल्या काही आरोपांची पुष्टी होत आहे. शौर्य पाटील याने शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून छळ झाल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहीत आत्महत्या केली होती. आरोप केलेल्या शिक्षकांवर तक्रार दाखल करण्यात आली असली तरी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेत शौर्य इयत्ता दहावीत शिकत होता. त्याने १८ नोव्हेंबरला राजेंद्रनगर येथील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत आत्महत्या केली होती. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शने केली होती. खानापूर तालुक्यातही आंदोलन करण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Court Issues Notice to Delhi Police in Shaurya Patil Suicide Case

Web Summary : Delhi High Court seeks report from police in Shaurya Patil suicide case. Family seeks CBI probe, alleging lapses in initial investigation. Next hearing is on December 12th.