शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 3:35 PM

काश्मिरी तरुणीला श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीस सुरुवात झाली आहे.

श्रीनगर  - काश्मिरी तरुणीला श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीस सुरुवात झाली आहे. ही चौकशी श्रीनगर येथील एचक्यू  15 कोअर येथे ब्रिगेडिअर अनुराग यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मेजर गोगोई हे एका काश्मिरी तरुणीला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादात सापडले होते. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत त्यांची वादावादीही झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.   या तपासादरम्यान घटना घडली त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. तसेच कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा अहवालही लवकरात लवकर दाखल करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर गोगोई यांच्याविरोधात कडक भूमिका स्वीकारली होती. तसेच लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही, मेजर गोगोई हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते.  लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यानंतर लष्कराने मेजर गोगोई यांच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले होते.  मे महिन्यामध्ये मेजर लीतुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. कर्मचाऱ्यांनी तरूणीचं ओळख पत्र तपासलं असता ती बडगामची रहिवासी असल्याचं समोर आलं. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितलं. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे गेल्याने गोगोई यांची चौकशी करण्यात आली होती. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्या