शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Court: 'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:18 IST

Court: सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला.

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या आणि पाचव्या नंबरच्या डोरंडा कोषागार प्रकरणात दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. 

सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. 15 फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एस.के. शशी यांच्या विशेष न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 जणांना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लालू यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. 

''लालुंजींनी भाजपसोबत हातमिळवणी केली असती तर त्यांना राजा हरिश्चंद्र असं संबोधलं असतं. पण, ते आज भाजप आणि आरएसएसशी पंगा घेत आहेत, त्यामुळेच त्यांना तुरुंगवासाची शिक्षा'' झाल्याचं लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तेजस्वी यादव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.   दरम्यान, लालू प्रसाद यादव सध्या प्रकृती अस्वस्थेमुळे रांचीमधील रिम्समध्ये येथे उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. 

तेजस्वी यादव यांनी सीबीआय, ईडीवरही निशाणा साधला आहे. देशात एकमेव चारा घोटाळाच झालाय का, इतर घोटाळ्याचं काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी हे कुठं आहेत, असेही तेजस्वी यांनी म्हटले. 

4 वेगवेगळ्या घोटाळ्यात शिक्षा

विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCourtन्यायालय