शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

या जोडप्यांच्या रोमान्सने पोलिसांना फोडलाय घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 12:07 IST

कुटुंबीयांपासून दूर सेफ होममधील एकांतामध्ये जोडप्यांच्या रोमँटिक चाळ्यांमुळे तेथे संरक्षणासाठी तैनात पोलिसांना मात्र अवघडल्यासारखे वाटत आहे.

चंदिगड - हरियाणामध्ये घरातून पळून लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या सेफ होमच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांना सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. कुटुंबीयांपासून दूर सेफ होममधील एकांतामध्ये जोडप्यांच्या रोमँटिक चाळ्यांमुळे तेथे संरक्षणासाठी तैनात पोलिसांना मात्र अवघडल्यासारखे वाटत आहे. या जोडप्यांचे चाळे हे हनिमुनसारखे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर पोलिस आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप येथील जोडप्यांनी केला आहे.    काही दिवसांपूर्वी राजस्थानातील एका प्रेमी युगुलाने घरातून पळून कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात हरियाणातील हिसार येथे विवाह केला होता. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना सेफ होममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तिथे एसएसओंनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळताना एचएसओ बिमला देवी यांनी सेफ होममध्ये राहत असलेल्या चार जोडप्यांपैकी एका जोडप्याचे वर्तन हे हनिमुनला आल्यासारखे असल्याने त्यांना खडसावल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फतेहाबादचे एसपी दीपक सहारन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून डीएसपी (एचक्यू) जगदीश कुमार चौकशी करत आहेत.  मात्र या चौकशीबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.  मात्र दुसरीकडे सेफ होममधीली जो़डप्यांच्या रोमँटिक वागण्यामुळे त्रास होत असल्याचे विविध ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. हिसारमधील सेफ होमच्या प्रभारी राजरानी यांनी सांगितले की, घरातील खोल्या आणि वॉशरूममध्ये या जोडप्यांकडून चाळे सुरू होतात. त्यामुळे शिष्टाचार पाळण्यासाठी त्यांना समजवावे लागते. जिंदमधील पोलीस कर्मचाऱ्यांनीही प्रेमी जोडप्यांपासून निर्माण होत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. यातील अनेक जोडपी अनुभवाने अपरिपक्व असतात, त्यामुळे मर्यादा पाळण्याबाबत त्यांना वारंवार समजवावे लागते, असे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :Policeपोलिसmarriageलग्नHaryanaहरयाणा