लग्न केले कोहलीशी पण 'तो' निघाला खान
By Admin | Updated: August 25, 2014 11:27 IST2014-08-25T10:29:20+5:302014-08-25T11:27:03+5:30
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने लव्ह जिहादविरोधात लढा देण्याचा निर्धार केला असतानाच एक राष्ट्रीय महिला नेमबाजही या लव्ह जिहादची शिकार झाल्याचे समोर येत आहे.

लग्न केले कोहलीशी पण 'तो' निघाला खान
लव्ह जिहादचा संशय
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २५ - उत्तरप्रदेशमध्ये भाजपने लव्ह जिहादविरोधात लढा देण्याचा निर्धार केला असतानाच एक राष्ट्रीय महिला नेमबाजही या लव्ह जिहादची शिकार झाल्याचे समोर येत आहे. रणजीतकुमार कोहली असे हिंदू नाव सांगत एका मुस्लीम तरुणाने या तरुणीशी लग्न केले व लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी तिला अमानूष मारहाण केल्याची घटना रांची येथे घडली आहे.
झारखंडमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव ही रांचीतील क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव करत असताना रणजितकुमार कोहली या तरुणाशी तिची ओळख झाली. कोहली हा मुस्लिम असून त्याचे मूळ नाव रकिबूल हसन खान असे आहे. मात्र त्याने ही बाब तारापासून लपवून ठेवत स्वतःची ओळख हिंदू तरुण म्हणून करुन दिली. काही दिवसांनी कोहलीने तिला लग्नासाठी विचारणा केली. तारा व तिच्या कुटुंबाने या लग्नाला होकार दिल्यावर २० जुलैरोजी रांचीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह पार पडला.
मात्र लग्नानंतर ताराला रणजितकुमारने लपवलेले वास्तव समजले. 'घरात आलेल्या निमंत्रणपत्रावर रकिबूल हसन खान असे नाव होते. तसेच घरात येणा-या मुस्लिम नातेवाईकांमुळे माझा पती रणजितकुमार कोहली नसूल रकिबूल हसन खान असल्याचे समजले असे तारा सचदेवने सांगितले. लग्नानंतर रकिबूलने मी इस्लामधर्म स्वीकारावा यासाठी मला अमानूष मारहाण केली. माझा मोबाईल फोनही काढून घेण्यात आला असे ताराने दिलेल्या तक्रारीते म्हटले आहे. रकिबूलने ताराचे नाव सारा असे ठेवले होते. ताराच्या अंगवार मारहाणीचे वळही आहेत. मी या प्रकाराने घाबरलेले पण भावाच्या मदतीने मी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असे ताराने स्पष्ट केले. रांची पोलिसांनी रकिबूल खान आणि त्याच्या आईविरोधात बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सध्या खान कुटुंब रांचीतून पसार झाले आहे.