शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर रुग्णालयानं दिलं ३५ हजारांचं बिल; पैसे नसल्यानं दाम्पत्यानं नवजात अर्भक विकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 09:03 IST

रुग्णालयानं कागदपत्रांवर अंगठा घेऊन १ लाख रुपयांना खरेदी केलं नवजात अर्भक

आग्रा: रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्यानं नवजात अर्भक विकण्याची वेळ एका आईवर आली. रुग्णालयात गेलेल्या महिलेची सिझरिंगद्वारे प्रसूती करण्यात आली. बबिता असं या महिलेचं नाव आहे. बबिताला डिस्चार्ज देताना रुग्णालयानं ३५ हजारांचं बिल दिलं. बबिताचा पती शिवचरणकडे रुग्णालयाचं बिल देण्यासाठी पैसे नव्हते. बिल भरण्यासाठी नवजात अर्भक एक लाख रुपयांना विका, असं रुग्णालयानं आपल्याला सांगितल्याचा आरोप दाम्पत्यानं केला.बबिता आणि शिवचरण यांचं हे पाचवं अपत्य आहे. ते उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यातल्या शंभू नगर येथे एका भाड्याच्या खोलीत राहतात. रिक्षा चालवून शिवचरण यांना दररोज १०० रुपये मिळतात. तेही रोज मिळतील की नाही याची शाश्वती नसते. त्यांचा सर्वात मोठा मुलगा १८ वर्षांचा आहे. तो एका बुटांच्या कंपनीत काम करतो. लॉकडाऊनमुळे त्याचा कारखाना बंद झाला. त्यामुळे त्याच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली.मी जिवंत आहे! नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार; पोलीस करत होते हत्येचा तपास, ‘ती’पुन्हा परतलीमोफत प्रसूती करू असं एका आशा सेविकेनं आपल्याला सांगितलं होतं अशी माहिती बबितानं दिली. 'आमचं नाव आयुष्यमान भारत योजनेत नाही. मात्र प्रसूती मोफत होईल, असं आशा सेविकेनं म्हटलं होतं. बबिताला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली असं सांगण्यात आलं. २४ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी तिनं एका मुलाला जन्म दिला,' असं शिवचरण यांनी सांगितलं.बापरे! अचानक गेली वीज, तब्बल 20 तास ट्रेनमध्ये अडकले हजारो प्रवासीरुग्णालयानं आम्हाला ३५ हजारांचं बिल देण्यास सांगितलं. मी आणि माझी पत्नी निरक्षर आहे. आम्हाला लिहिता वाचता येत नाही. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी काही कागदपत्रांवर आमचा अंगठा घेतला. आम्हाला डिस्चार्ज पेपर देण्यात आले नाहीत. त्यांनी आमच्या बाळाला एक लाख रुपयात खरेदी केलं, अशा शब्दांत शिवचरण यांनी त्यांची व्यथा मांडली.