इंदूर: मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाला बच्चन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाला बच्चन यांची मुलगी प्रतिक्षा बच्चन (२६) हिचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात राज्याचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते बाला बच्चन यांची मुलगी प्रेरणा हिच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांच्या मुलाचाही समावेश आहे.
प्रेरणा बच्चन आणि तिचे तीन मित्र शुक्रवारी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास कारने फिरण्यासाठी निघाले होते. रालामंडल बायपासवर त्यांची कार अतिवेगात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा हिस्सा अक्षरशः चिरडला गेला.
या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. १. प्रेरणा बच्चन: माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या. २. प्रखर कासलीवाल: मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा. ३. मनसिंधु: कारमधील तिसरा मित्र, ज्याचा जागीच मृत्यू झाला.
कारमध्ये चौथी प्रवासी असलेली अनुष्का नावाची तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला इंदूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
राजकीय वर्तुळात मोठी हळहळया अपघाताच्या बातमीने मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. बाला बच्चन आणि आनंद कासलीवाल हे दोन्ही काँग्रेसचे मोठे चेहरे असल्याने पक्षातील अनेक नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
Web Summary : Ex-minister's daughter, two others died in a car accident near Indore. Their five-star safety rated car crashed into a truck. One injured.
Web Summary : इंदौर के पास कार दुर्घटना में पूर्व मंत्री की बेटी सहित तीन की मौत हो गई। उनकी फाइव-स्टार सुरक्षा वाली कार ट्रक से टकरा गई। एक घायल।