शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Triple Talaq: हा देश शरियतवर नव्हे, संविधानावर चालतो- भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 16:42 IST

तिहेरी तलाकविरोधी विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवा; काँग्रेस, टीएमसीची मागणी

नवी दिल्ली: लोकसभेत आज तिहेरी तलाकवर चर्चा सुरू आहे. हे विधेयक संयुक्त निवड समितीला पाठवण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी केली. तर अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या विधेयकावरील सरकारची बाजू स्पष्ट केली. हा देश शरियतवर नाही, तर संविधानावर चालतो, असं नक्वींनी म्हटलं. बाल विवाहापासून सती प्रथा संपुष्टात आणण्यासही काहींनी विरोध केला होता. मात्र समाजानं या प्रथांना मूठमाती दिली, अशा शब्दांमध्ये त्यांनी तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. अनेक गंभीर गुन्ह्यांविरोधात कायदे आहेत. मग तिहेरी तलाकविरोधात कायदा का नको, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून कोणालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न नसल्याचंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. कभी-कभी लम्हों की खता, सदियों की सजा बन जाती है, अशा शब्दांत त्यांनी तिहेरी तलाकवर भाष्य केलं. 'तिहेरी तलाकविरोधी कायदा आधीच मंजूर झाला असता. मात्र काहींच्या दबावाखाली येऊन काँग्रेस सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी कायदा आणला,' असं म्हणत नक्वींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी विधेयकाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही गुन्हेगारीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या विधेयकाच्या विरोधात आहोत. पती तुरुंगात गेल्यावर तो काय कमावणार आणि पत्नीला भरपाई कशी काय देणार?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा परिस्थितीत तलाक मिळालेल्या महिलेला न्याय कसा मिळणार, असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकParliamentसंसदlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस