शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देश्

By admin | Updated: August 14, 2015 00:05 IST

ाला स्वातंत्र्य मिळाले तरी गोव्याला मात्र मुक्ती मिळाली नव्हती. या मुक्तीसाठी गोवेकरांना 14 वर्षे वाट बघावी लागली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यातील स्वातंत्रसैनिकांनी आपला लढा द्विगुणीत केला. पोतरुगीजांच्या राजवटी विरोधात बंडाचा झेंडा उभारलेल्या स्वातंत्रसैनिकांनी गोव्यातही स्वातंत्र दिवस पाळण्यासाठी तन्मयतेने कार्य करण्याचे ठरवले. मुक्ती पूर्वीच्या स्वातंत्र्य दिवसापासून प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांनी आपआपल्या परीने संघटीतपणे लढा उभारला होता.

ाला स्वातंत्र्य मिळाले तरी गोव्याला मात्र मुक्ती मिळाली नव्हती. या मुक्तीसाठी गोवेकरांना 14 वर्षे वाट बघावी लागली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यातील स्वातंत्रसैनिकांनी आपला लढा द्विगुणीत केला. पोतरुगीजांच्या राजवटी विरोधात बंडाचा झेंडा उभारलेल्या स्वातंत्रसैनिकांनी गोव्यातही स्वातंत्र दिवस पाळण्यासाठी तन्मयतेने कार्य करण्याचे ठरवले. मुक्ती पूर्वीच्या स्वातंत्र्य दिवसापासून प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांनी आपआपल्या परीने संघटीतपणे लढा उभारला होता.


कृपावंत लांजेकर- (स्वातंत्रसैनिक, खोर्ली-म्हापसा)
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर गोवा पोतरुगीजांच्या जाचातून कधी मुक्ती होईल याची तळमळ मनाला लागली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मी आपल्या परीने तप, त्याग, साहस व बलिदान यातून गोव्याच्या मुक्तीसाठी सुरू केलेले प्रयत्न द्विगुणीत करायला सुरुवात केली. सहकार्‍यांचा उत्साह वाढवला व जय हिंदच्या नार्‍याने कार्यास प्रारंभ केला.
आज वयाची 83 वर्षे पूर्ण केलेल्या लांजेकर यांनी 15 ऑगस्ट 1961 वर्षाचा तो दिवस आजही आठवला. आपल्याला देण्यात आलेल्या कार्यक्षेत्रात गोव्याला मुक्ती मिळवण्यासाठी लोकात जागृती करण्यावर भर द्यायला सुरुवात केली. मुक्ती लढय़ातील माझ्या साथीदारांच्या मदतीने ठिकठिकाणी पत्रकांचे वाटप केले. भाषणे दिली. मोर्चे काढले. सभा घेतल्या. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र देशाच्या नागरिकांनी अनुभवलेला मुक्त संचार, मुक्त वातावरण आम्ही आमच्या पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवली होती.

वासुदेव कामत (इब्रामपूर)
गोवा मुक्तीपूर्वीचा काळात आपण तुरुंगात होतो. त्यामुळे तुरुंगातूनच आमचे नियोजन व्हायचे. सुमारे 52 स्वातंत्र सैनिकांचा गट तुरुंगात होता. तुरुंगात केलेले नियोजन आम्ही गुप्तरित्या बाहेरील स्वातंत्रसैनिकापर्यंत पोहचवायचो. सुरुवातीला सुमारे 17 महिने आग्वाद येथील कारागृहात तर त्यानंतरचे काही महिने पणजीतील कारागृहात होतो. आमचा गट दहशत पसरवणारा गट असल्याने पोतरुगीजांची कडवी नजर आमच्यावर होती.

प्रभाकर शाबी येंडे (खोर्ली-म्हापसा)
मुक्ती चळवळीत स्वत:ला वाहून घेतलेले हे घराणे म्हणून येंडे घराणे प्रसिद्ध आहे. राज्याला मुक्ती मिळवण्याचा पूर्वीचा स्वातंत्र दिवस व त्यापूर्वीचे सगळे स्वातंत्र्य दिवस फटाके वाजवून गुलामगिरीतून आम्ही साजरा करायचो. मुक्ती पूर्वीचा स्वातंत्र्य दिवसाच्या आठवणी सांगताना त्या दिवशी रात्री फटाके वाजवून आम्ही देशाचे स्वातंत्र्यदिन साजरे केल्याचे ते म्हणाले. वाजवेले फटाके कोणी वाजवले याची चौकशी पोतरुगीज पोलिसांनीही सुरू केली होती.
त्यानंतर मुक्तीसाठीच्या घडामोडी, चळवळीची व्याप्ती वाढवली. त्यावेळी त्यांचे वय अवघ्या 17 वर्षांचे होते. घरातील वातावरण व जेष्ठ स्वातंत्र सैनिक पिटर आल्वारीस यांच्या लाभलेल्या नेतृत्वाखाली सुरू केलेला बंडाचा लढा मुक्ती मिळेपर्यंत चालूच ठेवला. आमची चळवळ निशस्त्रपणाची होती.

रंगनाथ यशवंत नाईक (धुळेर-म्हापसा)
पोतरुगीज सरकाराच्या विरोधात आम्ही सुरू केलेल्या दहशतीच्या कारवायामुळे त्यांचे पोलीस आमच्यामागे लागल्याने आम्ही काही स्वातंत्र्यसैनिक भूमीगत होवून फिरत होतो. गोव्याची मुक्ती दृष्टीक्षेपात दिसत असल्याने आमच्या काही सहकार्‍यांनी दोडामार्ग येथे जावून देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. तेथे तिरंगा फडकावून त्याला वंदन करून जय हिंदचे नारे दिले. त्या दिवसापासून गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठीचे लागणारे मनोधैर्य सगळ्य़ांनी वाढवून कामाला सुरुवात केली. यात र्शीकांत नाईक, कांता घाटवळ, महाबळेश्वर दिवकर, महाबळेश्वर नाईक, कानोबा नाईक व इतर स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता.

शामसुंदर द नागवेकर, मयडे (गोवा दमण व दिव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष)
पत्रादेवी येथे ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे तेथे मुक्तीसाठी बलिदान देवून हुतात्म पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण व त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्या जागेवर मोठी सभा घेतली होती. स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला स्वातंत्र्यसैनिक व इतर लोक मिळून सुमारे 500 वर जनसमुदाय तेथे हजर होता. ज्या जागेवर वीरांनी आपले बलिदान दिले त्या वरुन भाषण करताना लवंदे यांनी त्यांचे बलिदान व्यर्थ जावू देण्यात येणार नसल्याची घोषणा केली. त्यांच्या योगदानाचे महत्त्व इतर लोकांना पटवून दिले. यावेळी झोटीको डिसोझा, शिवाजी देसाई, नारायण नाईक, कांता घाटवळ आदी स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता.
त्या नंतर तेथून मोठा मोर्चा काढण्यात आला व त्या दिवसापासून मुक्तीसाठी धगधगत असलेला ज्वालामुखी उग्र करण्यात आला. सुरू असलेल्या आंदोलनाला जोर चढला. त्यानंतर लोकांत जागृती करण्यावर आम्ही जास्त प्रमाणावर भर दिल्याचे ते म्हणाले.

काशिराम बाबल बुगडे पार्सेकर (म्हापसा)
आझाद गोमन्तक दलातून मुक्तीलढय़ात उतरलेल्या काशिराम यांनी मुक्तीच्या पूर्वी बरेच कार्य केले आहे. पोतरुगीज पोलिसांचा ससेमीरा पाठीमागे लागला होता. घरातील इतर लोक मुक्ती लढय़ातले असल्याने पोतरुगीजांना आमच्या घराण्यासंबंधी बराच संशय होता. ऑगस्ट 1961 मध्ये देशातील इतर लोकां बरोबर देशाच्या स्वातंत्र्याचा आनंदी दिवस गोव्यातही साजरा केला. इथे मोर्चे काढले, सभा घेतल्या. त्यावेळी प्रभाकर सिनारी, आत्मा मयेकर, मोहन रानडे, मनोहर सावकर आदी मान्यवर होते. पणजीत आदिलशहाच्या राजवाड्यावर काढलेल्या मोर्चावेळी गोळीबार करण्यात आला. त्यामुळे लपून बसायची पाळी आमच्यावर आली.
म्हापशातील पोस्ट कार्यालयाची तोडफोड करण्याचे षडयंत्र रचले होते; पण त्याचा सुगावा लागल्याने रचलेले षडयंत्र यशस्वी होवू शकले नाही.
त्यांना अटकही करण्यात आली होती. हातात बेड्या टोकलेल्या अवस्थेत बरीच मारझोड करण्यात आली होती; पण गोव्याच्या मुक्तीसाठी तेवत ठेवलेली ज्योत भारताच्या लष्करांने गोव्यात प्रवेश करण्यापर्यंत पेटत होती. गोव्यात आलेल्या लष्कराला सहकार्य करण्याचे दावीत्वही त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

फोटो :
1) कृपावंत लांजेकर (1308-एमएपी-01)
2) वासुदेव कामत (1308-एमएपी-02)
3) प्रभाकर शाबी येंडे (1308-एमएपी-3)
4) रंगनाथ यशवंत नाईक (1308-एमएपी-04)
5) शामसुंदर द नागवेकर (1308-एमएपी-05)
6) काशिराम बाबल बुगडे पार्सेकर (1308-एमएपी-06)