देशात गतवर्षी महिलांहून पुरुषांच्या आत्महत्या दुप्पट
By Admin | Updated: July 25, 2014 02:36 IST2014-07-25T02:36:07+5:302014-07-25T02:36:07+5:30
वर्ष 2013 मध्ये देशात आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत दुप्पटीहून जास्त होती.

देशात गतवर्षी महिलांहून पुरुषांच्या आत्महत्या दुप्पट
नवी दिल्ली : वर्ष 2क्13 मध्ये देशात आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत दुप्पटीहून जास्त होती. एवढेच नव्हे तर त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आत्महत्यांमधील पुरुष-महिलांचे गुणोत्तर गेल्या वर्षी किंचित वाढल्याचेही दिसते.
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारतात एकूण एक लाख 34 हजार आत्महत्यांची नोंद झाली. आत्महत्या करणा:यांमध्ये 64,क्98 पुरुष होते तर 29,491 महिला होत्या. म्हणजेच पुरुष व महिलांच्या आत्महत्यांचे गुणोत्तर 67.2:32.8 असे होते. त्याआधीच्या वर्षी म्हणजे सन 2क्12 मध्ये हे गुणोत्तर 66.2:33.8 असे होते. वयाच्या 14 व्या वर्षार्पयत झालेल्या आत्महत्यांचा विचार केला तर त्यात मुले व मुलींचे गुणोत्तर 53.5: 46.5 असे होते. त्याआधीच्या वर्षी हे गुणोत्तर 48.4:51.6 होते. म्हणजेच आत्महत्या करणा:या महिला व
मुलींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसते.
या आकडेवारीचा आणखी एक धक्कादायक पैलू असा की, या आत्महत्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 8क् हजारांहून अधिक आत्महत्या 15 ते 44 या वयोगटातील व्यक्तींनी केलेल्या होत्या. मानवी जीवनात हा काळ सर्वाधिक उमेदीचा काळ मानला जातो. यातही 15 ते 19 या वयोगटातील तरुण व्यक्तींचे प्रमाण 34.4 टक्के आणि 3क् ते 44 मध्यम वयोगटातील आत्महत्यांचे प्रमाण 33.8 टक्के होते.
गेल्या वर्षी भारतात दर तासाला सरासरी 15 आत्महत्या झाल्या, असेही ही आकडेवारी दर्शविते.
ही आकडेवारी केवळ पोलिसांकडे नोंदल्या गेलेल्या आत्महत्येच्या प्रकरणांची आहे. परंतु अनेक आत्महत्यांची पोलिसांकडे नोंद होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय आत्महत्यांची नेमकी कारणो समजली तर तशा मनस्थितीत असलेल्यांना योग्य मानसोपचार सल्ला देऊन अशा आत्मघाती पावलापासून परावृत्त करणो शक्य होऊ शकते. त्यामुळे क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत बहुसंख्य आत्महत्यांसाठी दिले जाणारे ‘कौटुंबिक समस्या’ हे ढोबळ कारण प्रतिबंधासाठी पुरेसे नाही, असे तज्ज्ञांना वाटते.
योग्य सल्ला व प्रतिबंधक योजनेसाठी नेमके कारण नोंदविणो किती महत्त्वाचे असते हे सांगताना एका मानसोपचार तज्ज्ञाने सांगितले की, क्षणिक भावनातिरेकाच्या भरात आत्महत्या केल्याची उदाहरणो विरळा आढळतात. प्रत्यक्ष आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीची त्यासाठीची मनोधारणा ब:याच आधीपासून तयार झालेली असते. कदाचित त्या
व्यक्तीने आधी आत्महत्येचे असफल प्रयत्नही केलेले असू शकतात. परंतु हे धोक्याचे इशारे कुटुंबियांना ओळखता आलेले नसतात.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4जीवनात येणारे कमालीचे नैराश्य हे आत्महत्येचे प्रमुख कारण.
4जीवनातील वाढते ताणतणाव व झपाटय़ाने होणा:या सामाजिक बदलांशी जुळवून घेण्यातील अपयश ही नैराश्येची प्रमुख कारणो.
4महिला निसर्गत:च अधिक सहिष्णू असतात व जीवनातील अनपेक्षित धक्क्यांना त्या अधिक धैर्याने तोंड देतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती तुलनेने कमी आढळते.
4अती मद्यपानामुळे येणारी हताशा हे पुरुषांमधील आत्महत्येचे वाढीव कारण दिसते.