शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण...", उद्धव ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:06 IST

INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक झाली.

opposition meeting in bangalore | बंगळुरू : आगामी २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी आज विरोधी पक्षांची बंगळुरूत बैठक पार पडली. बिहारची राजधानी पाटणा येथे पहिली बैठक झाल्यानंतर आजच्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले होते. तर पुढची तिसरी बैठक मुंबईत होणार असून तेव्हा आघाडीचा चेहरा ठरवला जाईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली असून 'INDIA' या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलताना 'ही लढाई तानाशाही विरोधात' असल्याचे म्हटले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज दुसरी यशस्वी बैठक झाली असून तानाशाहीविरूद्ध जनता एकत्र आली आहे. आघाडीचे नाव जाहीर झाले आहे. 'इंडिया' ज्याच्यासाठी आपण लढत आहोत आणि त्यासाठीच एकत्र आलो आहोत. राजकारणात वेगवेगळी विचारधारा असते आणि ते गरजेचे देखील आहे. पण, तरीदेखील आपण एकत्र आलो आहोत. काही लोकांना वाटते की आम्ही कुटुंबासाठी एकत्र आलोय. मी त्यांना सांगेन की, होय, हा देश आमचे कुटुंब असून त्याला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची लढाई एका व्यक्तीविरूद्ध किंवा एका पक्षाविरूद्ध नाही तर एका विचारसरणीविरूद्ध आहे. एकेकाळी ज्याप्रकारे स्वातंत्र्याची लढाई झाली. आज ते स्वातंत्र्य धोक्यात आले असून त्यासाठी आमची एकजुट आहे. मला विश्वास आहे की यात आम्ही यशस्वी होऊ. देशाच्या जनतेला मी सांगू इच्छितो की, 'हम है ना' घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत.

 अरविंद केजरीवालांचा घणाघात"मागील ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप काही करू शकले असते पण त्यांनी सर्वच क्षेत्रांना उद्ध्वस्त केले. आम्ही इथे स्वतःसाठी नाही तर देशाला द्वेषापासून वाचवण्यासाठी जमलो आहोत", अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.

टॅग्स :BengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटकUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी