शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश : सीमा ओलांडल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या विधानाने वाद

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौर्‍यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विधान केले.

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौर्‍यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विधान केले.
ते तमिळ थांती टीव्हीशी बोलत होते. भारतीय मच्छीमारांनी श्रीलंकेच्या उत्तरेतील मच्छीमारांची उपजीविका हिसकावल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, जर कोणी आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर मी गोळी घालू शकतो. मग भलेही यात समोरचा मारला जाऊ द्या. कायदा आम्हाला असे करण्याची मुभा देतो. मच्छीमारांच्या मुद्यावर ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार, आमच्या सीमारेषा बळकट आहेत. हे आमचे सागरी क्षेत्र आहे. जाफनाच्या मच्छीमारांना तेथे मासेमारी करू दिली पाहिजे. आम्ही त्यांना मासेमारी करण्यापासून रोखले. त्यामुळे ते आता तोडगा काढण्यास तयार झाले. तोडग्याला आक्षेप नाही. सन्मानजनक तोडगा निघायला हवा; मात्र श्रीलंकेच्या उत्तर भागातील मच्छीमारांच्या उपजीविकेच्या किमतीवर अशा प्रकारचा तोडगा मान्य नाही.
श्रीलंकन लष्कराने केलेल्या गोळीबारात गेल्या वर्षी ६०० भारतीय मारले गेल्याबाबतच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अलीकडे अशी घटना घडलेली नाही. श्रीलंकेच्या लष्कराने भारतीय मच्छीमारांवर गोळीबार करण्याची शेवटची घटना २०११ मध्ये झाली होती. यातील अनेक घटना श्रीलंकेतील यादवीदरम्यान घडल्या होत्या. यातील काही लोक हे शस्त्रांच्या पुरवठ्यात सहभागी होते, असे विक्रमसिंघे म्हणाले. उत्तरेकडील मच्छीमार आजही आम्हाला विचारतात की श्रीलंकन नौदल आमचे रक्षण का करीत नाही. आम्ही आमच्या मच्छीमारांना आमची सागरी सीमा कोणती आहे हे समजावून सांगायला हवे. आम्ही भारताशी चर्चा करून यातून मार्ग काढायला हवा. भारतीय मच्छीमारांनी श्रीलंकन हद्दीत मासेमारी करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते आमच्या हद्दीत काय करीत आहेत? त्यांनी त्यांच्या हद्दीत मासेमारी करावी आणि आमच्या मच्छीमारांना आमच्या हद्दीत मासेमारी करू द्यावी, असेही ते म्हणाले. त्यामुळे समस्या उद्भवणार नाही. अन्यथा आमच्या नौदलावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करू नये, असे ते म्हणाले. इटालियन खलाशांचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, जर भारत इटलीचा मित्र आहे तर त्याने इटलीबाबतही तीच उदारता दाखवायला हवी जो ती आमच्याकडून अपेक्षित करतो, असेही विक्रमसिंघे म्हणाले. श्रीलंकेच्या लष्कराने गेल्या महिन्यात ८६ मच्छीमारांना अटक करून त्यांच्या १० नावा जप्त केल्या होत्या.