देश-परदेश : जर्ब-ए-अज्बच्या वर्षपूर्तीनिमित्त पाक लष्कराचा देशभक्तीपर व्हिडिओ
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30
कराची : दहशतवाद्यांचे देशातून उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर राबवत असलेल्या जर्ब - ए - अज्ब मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराच्या जनसंपर्क विभागाने देशभक्तीपर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ चार मिनिटांचा असून दहशतवाद्यांनी शस्त्रे रोखल्यामुळे भेदरून गेलेल्या बालकाच्या दृश्याने त्याचा प्रारंभ होतो. दुसर्या दृश्यात दहशतवादी आदिवासींना धमकावताना दिसतात. त्यानंतर पाकिस्तानी सैनिक हिंसाचारग्रस्त भागात जाण्यासाठी लष्करी विमाने आणि वाहनांत बसताना दिसतात. शेवटी सैनिक आणि दहशतवाद्यांत लढाई होऊन सैनिक दहशतवाद्यांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करतात, असे दाखविण्यात आले असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. हा व्हिडिओ लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक असिम बज्वा यांची कल्पना असून लोकांत पुन्हा विश्वास निर्माण करून राष्ट्र सुरक्षित असल्याचा संदेश देण्याच्या हेतूने

देश-परदेश : जर्ब-ए-अज्बच्या वर्षपूर्तीनिमित्त पाक लष्कराचा देशभक्तीपर व्हिडिओ
क ाची : दहशतवाद्यांचे देशातून उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर राबवत असलेल्या जर्ब - ए - अज्ब मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराच्या जनसंपर्क विभागाने देशभक्तीपर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ चार मिनिटांचा असून दहशतवाद्यांनी शस्त्रे रोखल्यामुळे भेदरून गेलेल्या बालकाच्या दृश्याने त्याचा प्रारंभ होतो. दुसर्या दृश्यात दहशतवादी आदिवासींना धमकावताना दिसतात. त्यानंतर पाकिस्तानी सैनिक हिंसाचारग्रस्त भागात जाण्यासाठी लष्करी विमाने आणि वाहनांत बसताना दिसतात. शेवटी सैनिक आणि दहशतवाद्यांत लढाई होऊन सैनिक दहशतवाद्यांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करतात, असे दाखविण्यात आले असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. हा व्हिडिओ लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक असिम बज्वा यांची कल्पना असून लोकांत पुन्हा विश्वास निर्माण करून राष्ट्र सुरक्षित असल्याचा संदेश देण्याच्या हेतूने तो तयार करण्यात आला आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. बज्वा यांनी जर्ब ए अब्ज मोहिमेबाबत केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी सुरू झालेल्या या मोहिमेने २,७६३ संशयित दहशतवाद्यांना ठार करून दहशतवाद्यांचे ८३७ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. २५३ टन स्फोटके हाती लागलेल्या या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी लष्कराचे ३५० सैनिक मृत्युमुखी पडले.