मतमोजणी कक्षाबाहेर पक्षनिहाय बैठक व्यवस्था : शर्मा संवेदनशील गावांतही राहणार पोलीस बंदोबस्त

By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:50+5:302014-05-09T18:10:50+5:30

कोल्हापूर : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांनालागून राहिली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. १६) कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी जुना पुणे-बंगलोर महामार्गावरील कृषी महाविद्यालयाच्यासमोरील असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीमध्येही होणार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना विचारले असता त्यावेळी ते बोलत होते.

Counter-meeting meeting arrangement outside the counting of seats: Police settlement will remain in sensitive sensitive area | मतमोजणी कक्षाबाहेर पक्षनिहाय बैठक व्यवस्था : शर्मा संवेदनशील गावांतही राहणार पोलीस बंदोबस्त

मतमोजणी कक्षाबाहेर पक्षनिहाय बैठक व्यवस्था : शर्मा संवेदनशील गावांतही राहणार पोलीस बंदोबस्त

ल्हापूर : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांनालागून राहिली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. १६) कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी जुना पुणे-बंगलोर महामार्गावरील कृषी महाविद्यालयाच्यासमोरील असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीमध्येही होणार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना विचारले असता त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले, मतमोजणीदिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व दक्षता म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एका ठिकाणी, तर शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांची दुसर्‍या ठिकाणी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्‘ातील अतिसंवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
---------------------
फोटो : मनोजकुमार शर्मा यांचा संग्रहित वापरा.
====================

Web Title: Counter-meeting meeting arrangement outside the counting of seats: Police settlement will remain in sensitive sensitive area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.