कोथिंबिरीला प्रतिशेकडा १५०० रुपये दर
By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:18+5:302014-05-12T19:48:18+5:30
सावरवाडी : गेल्या आठवड्यापासून कोथिंबिरीला प्रतिशेकडा पंधराशे रुपये दर मिळू लागल्याने ऐन उन्हाळ्यात करवीर तालुका पश्चिम भागात कोथिंबीर पिकाकडे शेतकर्यांचा कल वाढू लागला आहे.

कोथिंबिरीला प्रतिशेकडा १५०० रुपये दर
स वरवाडी : गेल्या आठवड्यापासून कोथिंबिरीला प्रतिशेकडा पंधराशे रुपये दर मिळू लागल्याने ऐन उन्हाळ्यात करवीर तालुका पश्चिम भागात कोथिंबीर पिकाकडे शेतकर्यांचा कल वाढू लागला आहे.यावर्षी ग्रामीण भागात उन्हाळ्यात कोथिंबीर पीक घेण्यासाठी मशागतीच्या कामाची झुंबड उडू लागली आहे. शेतीमध्ये लहान-लहान ओपे तयार करणे, विविध खतांचा डोस देणे यासारख्या कामांना गती आली आहे.सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे कोथिंबीरला चांगला दर मिळू लागला आहे. कोथिंबीर पिकापासून यावर्षी शेतकर्यांना चांगलाच आर्थिक नफा मिळू लागला आहे. एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात कोथिंबिरीला जादा दर मिळू लागला आहे. सरासरी एकरी दीड लाखाचे उत्पादन शेतकर्यांना कोथिंबीर पिकातून मिळू लागले आहे. ग्रामीण व शहरी बाजारपेठेत कोथिंबीर पिकांच्या लागवडीकरिता धने खरेदीसाठी शेतकर्यांची गर्दी होऊ लागली आहे.