भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग - मोदी
By Admin | Updated: August 19, 2014 16:30 IST2014-08-19T16:30:06+5:302014-08-19T16:30:06+5:30
भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग असून या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे असे विधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग - मोदी
ऑनलाइन लोकमत
कैंथल (हरियाणा), दि. १९ - भ्रष्टाचार हा कर्करोगापेक्षाही भयंकर रोग असून या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे असे विधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 'माझं काय ?, मला काय ?' या वृत्तीने देशाचे वाटोळे केले असे परखड मतही त्यांनी मांडले आहे.
हरियाणातील कैंथल येथे १६६ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मी भ्रष्टाचारावर बोललो नाही यावर काही जणांनी प्रश्न उपस्थित केले. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला भ्रष्टाचार नको असून भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आम्हाला जनतेची साथ हवी आहे. भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची गरज आहे.
देशातील सर्व समस्यांवर विकास हा एकमेव तोडगा आहे. देशातील जनतेला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते हवे आहेत. कोणताही कंत्राटदार येतो, रस्ता बांधतो आणि पहिल्याच पावसात तो रस्ता खराब होतो हे आता चालणार नाही असेही मोदींनी स्पष्ट केले. केवळ रस्ते आणि रेल्वे मार्गानेच विकास होणार नाही. तर आधूनिक भारताची गरज पूर्ण करण्यासाठी ऑप्टीकल फायबर, गॅस प्रकल्पाच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे असे मोदींनी सांगितले.