शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

Telangana High Court : भ्रष्ट मतदारांना मिळतात भ्रष्ट नेते, तेलंगणा उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 8:52 AM

Telangana High Court : १ जून २०१५ रोजी तेलंगणा विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुका होणार होत्या. यात विधान परिषदेतील सदस्य हे मतदार होते. एल्विस स्टिफेन्सन हे विधानसभेचे सदस्य होते.

- डॉ. खुशालचंद बाहेती 

हैदराबाद : मतदार स्वत: भ्रष्ट असतील तर ते नेते प्रामाणिक असावेत अशी अपेक्षा करू शकत नाहीत, असे मत व्यक्त करीत तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्या. के. लक्ष्मण यांनी मतदानाचे महत्त्व विषद केले आहे. हैदराबाद येथे गाजलेल्या कॅश फॉर व्होट घोटाळ्याशी संबंधित याचिका सुनावणीस आली तेव्हा हे मत व्यक्त करण्यात आले.१ जून २०१५ रोजी तेलंगणा विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुका होणार होत्या. यात विधान परिषदेतील सदस्य हे मतदार होते. एल्विस स्टिफेन्सन हे विधानसभेचे सदस्य होते. त्यांना रेवनथ रेड्डी हे भेटले व तेलगु देसम पार्टीच्या उमेदवारास मतदान करावे किंवा मतदानाच्या दिवशी परदेशी निघून जावे, यासाठी ५ कोटी रुपये देऊ केले. एल्विस स्टिफेन्सन यांनी अँटिकरप्शन ब्युरोच्या पोलीस अधीक्षकांना कळविले. ठरल्याप्रमाणे रेवनथ रेड्डी एल्विस स्टिफेन्सन यांच्या घरी आले व ५० लाख रुपये आगाऊ दिले. अँटिकरप्शनने सापळा लावून रेड्डी यांना पकडले.  रेवनथ रेड्डी व इतर चारजणांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (लोकसेवकास लाच देणे) आणि आयपीसीच्या कलम १२० ब (गुन्ह्याचा कट रचणे) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. हा खटला रद्द व्हावा, यासाठी रेवनथ रेड्डी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत निवडणुकीतील गैरव्यवहारासाठी आयपीसीच्या प्रकरण ९ अ मध्ये कारवाईची तरतूद आहे. यामुळे हा गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा होत नाही. यामुळे एसीबीला गुन्हा दाखल करण्याचे व तपासाचे अधिकार नाहीत, असा मुद्दा होता. याशिवाय आमदार हे या निवडणुकीत फक्त मतदाराच्या भूमिकेत होते. ते आमदार म्हणून कोणतेही सार्वजनिक कर्तव्य करीत नव्हते म्हणून मतदार असणारे आमदार लोकसेवक ठरत नाहीत. हा युक्तिवाद होता, तो यासाठी की, आमदार केवळ मतदार होते व लोकसेवक नव्हते हे मान्य झाले की, लोकसेवकांना लाच दिली हा मुद्दा राहत नाही व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आपोआप रद्द होतो. उच्च न्यायालयाने हे मुद्दे फेटाळले आणि खटला चालविण्याची परवानगी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क हा लोकशाही सरकारचा अविभाज्य घटक आहे, मतदानावरून मतदारांचे राजकीय शिक्षण कसे झाले, हे समजेल, असे म्हटले आहे. जर नेते प्रामाणिक असावेत अशी अपेक्षा असेल, तर मतदारांनीही प्रामाणिक असले पाहिजे.के. लक्ष्मण, तेलंगणा उच्च न्यायालय, हैदराबाद 

टॅग्स :Courtन्यायालय