पालिकेचा ढिसाळ कारभार श्रीराम

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:09+5:302015-08-28T23:37:09+5:30

पूर पालिका: विरोधकांचा आरोप

The corporation's poor management Shriram | पालिकेचा ढिसाळ कारभार श्रीराम

पालिकेचा ढिसाळ कारभार श्रीराम

र पालिका: विरोधकांचा आरोप
श्रीरामपूर : शहरातील अनेक ठिकाणी असलेले कचर्‍याचे ढिग, वाढणारे साथीचे रोग, अस्वच्छता व डासांची वाढलेली संख्या यास श्रीरामपूर नगरपालिकेचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी नगरसेविकांनी केला आहे.
स्वच्छता व आरोग्याबाबत काळजी घेण्याऐवजी पत्रकबाजी करुन श्रीरामपूर नगरपालिका जबाबदारी झटकीत असल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेत्या भारती कांबळे, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, निर्मला मुळा व रजियाबी जहागीरदार म्हणाल्या, पालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कचर्‍याचे ढिग, साथीचे रोग, डासांची वाढलेली संख्या यावर पालिकेचे अगोदर उपाययोजना कराव्यात. नंतर जनतेला स्वच्छतेचे आवाहन करावे. अस्वच्छता वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, ताप यासारख्या आजाराचे रूग्ण निदर्शनास येत आहेत. त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबियांना विनाकारण दवाखान्याचा औषधोपचाराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या रात्रीच्या झोपा उडाल्या असून नागरिकांना रात्री जागून काढाव्या लागत आहेत. आजार व अस्वच्छता वाढत असताना पालिकेमार्फत दखल घेतली नसून साफसफाई व औषध फवारणी केली जात नसल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. वाढती रोगराई आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने धडक मोहीम हाती घेण्याची मागणीही या नगरसेविकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The corporation's poor management Shriram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.