कॉर्पोरेट क्षेत्रने माजी सैनिकांची सेवा घ्यावी
By Admin | Updated: August 20, 2014 01:11 IST2014-08-20T01:11:50+5:302014-08-20T01:11:50+5:30
उच्च प्रशिक्षित आणि अनुशासित कार्यदलाची आपली गरज भागवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रने माजी सैनिकांची सेवा घ्यावी, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.
कॉर्पोरेट क्षेत्रने माजी सैनिकांची सेवा घ्यावी
नवी दिल्ली : उच्च प्रशिक्षित आणि अनुशासित कार्यदलाची आपली गरज भागवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रने माजी सैनिकांची सेवा घ्यावी, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.
कॉर्पोरेट इंडियाला प्रशिक्षित आणि अनुशासित श्रमशक्तीची आवश्यकता आहे. माजी सैनिकांच्या स्वरूपात अशा लोकांचा मोठा गट उपलब्ध आहे. कामच्या प्रती त्यांची निष्ठा अतुलनीय आहे. त्यांचे अनुशासन उच्च दर्जाचे आहे आणि ते कठीण स्थितीत काम करतात, असे जेटली म्हणाले. संरक्षणमंत्री ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिसेटलमेंट कान्क्लेव्ह’मध्ये बोलत होते. भारतीय उद्योग संघ आणि लष्कर मिळून माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4बहुतांश माजी सैनिक संरक्षण दलातून कमी वयात सेवानिवृत्त होतात; परंतु ते कधी थकत नाहीत आणि नेहमी जीवनात पुढे जाण्यास तयार असतात.
4छावणी क्षेत्र इतर क्षेत्रच्या तुलनेत नीटनेटके असते. तसेच असैन्य इमारतीपेक्षा संरक्षण इमारती चांगल्या स्थितीत असतात, यावरून सशस्त्र दलांच्या व्यवस्थापन कौशल्याची कल्पना येते.