CorpnaVirus: भारतात बाधितांची संख्या ८२ दिवसांनंतर १ वरून वीस हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:08 IST2020-04-24T04:35:58+5:302020-04-24T07:08:34+5:30

अमेरिका, युरोपात १५-२० दिवसांतच आकडा पार

CorpnaVirus number of infected people in India increased from 1 to 20000 in 82 days | CorpnaVirus: भारतात बाधितांची संख्या ८२ दिवसांनंतर १ वरून वीस हजारांवर

CorpnaVirus: भारतात बाधितांची संख्या ८२ दिवसांनंतर १ वरून वीस हजारांवर

- विशाल शिर्के 

पुणे : कोरोनाबाधितांच्या आकड्यात जगभरामधे दररोज हजारोंच्या संख्येने भर पडत आहे. भारतात तब्बल ८२ दिवसांनी कोरोनाबाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला. अमेरिका, इटली, फ्रान्स या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा तितक्या वेगाने वाढला नसल्याबद्दल भारत सरकारमधील काही व्यक्ती स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, चीनबरोबरच बाधित आढळलेल्या जपान, थायलंड, रिपब्लिक कोरिया (दक्षिण कोरिया) या देशांनी कोरोनाची लागण लवकर होऊनही साथीचा फैलाव रोखण्यात यश मिळविले आहे. या देशांनी अजूनही बाधितांचा आकडा १५ हजारांच्या वर जाऊ दिलेला नाही. त्याकडे मात्र, आपले धोरणतज्ज्ञ दुर्लक्ष करत आहेत.

चीनमधे डिसेंबर २०१९मधे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे आता संशोधनातून पुढे आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा २१ जानेवारी २०२०रोजी पहिला अहवाल जाहीर केला. त्यात जगभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या २८२ होती. चीनसह चार देशांमधे त्याचा फैलाव होता. एकूण बाधितांपैकी २८२ रुग्ण चीनमध्ये, तर थायलंड २, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला होता.

जागतिक आरोग्य संघटनेकडे बुधवारी (दि.२२ ) जगभरात २४ लाख ७१ हजार १३६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी भारतात १९,९९४ रुग्ण असल्याचे म्हटले आहे. भारतातील बाधितांचा आकडा बुधवारीच २१ हजारांच्या वर गेला आहे. त्यात सातत्याने वाढच होत आहे. भारतात पहिला रुग्ण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आढळला. जागतिक आरोग्य संघटनेच्या १ फेब्रुवारीच्या अहवालामध्येदेखील भारतात १ रुग्ण होता. त्यामुळे एकवरून २० हजारांचा टप्पा ओलांडायला भारताला ८२ दिवस लागले आहेत.

चीनमध्ये पहिल्या पंधरवड्यातच वीस हजार रुग्णांचा टप्पा पार गेला होता. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या गुरुवारी दुपारपर्यंत २६ लाख ३० हजारांवर गेली होती. त्यात अमेरिकेची रुग्णसंख्या तब्बल ८ लाख ४२ हजार इतकी होती. अमेरिकेत १ फेब्रुवारी रोजी ७ रुग्ण संख्या होती. त्यानंतरच्या साठ दिवसांत त्यात १ लाख ४० हजारापर्यंत वाढ झाली. युरोपमधे कोरोनाचा विस्फोट दिसत असला, तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रुग्णसंख्या १ फेब्रुवारीला होती. त्यांच्या तुलनेत भारतामध्ये वाढ झालेली नाही, हे खरेच आहे. मात्र एकप्रकारे आपले शेजारी असलेल्या जपान, थायलंड आणि रिपब्लिकन कोरिया या देशांत फैलावाच्या पहिल्या टप्प्यातच रुग्ण आढळूनही या देशांनी प्रसार रोखला आहे, याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

जर्मनीतील रुग्णसंख्या ७ वरून ६१ हजारांवर ६० दिवसांत गेली
इटलीत २ वरून २१ हजारांवर रुग्णसंख्या जाण्यास ४५ दिवस लागले
फ्रान्समधे ६ वरून ४५ हजार रुग्णसंख्या ६० दिवसांत झाली
स्पेनमधे १ वरून ८५ हजार रुग्णसंख्या ६० दिवसांत गेली
ब्रिटनमधे २ वरून २२ हजारांवर रुग्णसंख्या जाण्यास ६० दिवस लागले
अमेरिकेत ७ वरून १ लाख ४० हजारांवर जाण्यास ६० दिवसांचा कालावधी लागला

लोकसंख्या आणि बाधा
जगात चीन, भारत आणि अमेरिकेची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात चीनची १३९ कोटी, भारत २३५ आणि अमेरिकेची ३३ कोटी लोकसंख्या आहे. युरोपात सर्वाधिक बाधित देशांमधे जर्मनीची लोकसंख्या सर्वाधिक ८.३ कोटी असून, ब्रिटनची ६.६६ कोटी आहे. तर, जपानची पावणेतेरा कोटी आहे. युरोप आणि अमेरिकेतच सर्वाधिक फैलाव झाला आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास महाराष्ट्राचीच लोकसंख्या १२ कोटींच्या वर आहे.

देश        १ फेब्रुवारी       १५ मार्च       ३१ मार्च       १५ एप्रिल       २२ एप्रिल
भारत            १                 १०७           १,०७          ११,४३९         १९,८८४
चीन          ११,८२१        ८१,०४८      ८२,५४५       ८३,७४५        ८४,२८७
अमेरिका      ७               १,६७८     १,४०,६४०    ५,७८,२६८    ७,७६,९०७
जर्मनी          ७               ३,७९५       ६१,९१३       १,२७,५८४     १,४५,६९४
इटली           २               २१,१५७    १,०१,७९३     १,६२,४८८      १,८३,९५७
फ्रान्स           ६               ४,४९६      ४३,९७७       १,०२,५३३      १,१६,१५१
स्पेन             १                ५,७५३       ८५,१९५      १,७२,५४१      २,०४,१७८
ब्रिटन           २                 १,१४४       २२,१४५        ९३,८७७       १,२९,०४८
इराण           -                १२,७२९      ४१,४९५        ७४,८७७        ८४,८०२
जपान         १७                 ७८०          १,९५३           ८,१००          ११,४९६
थायलंड      १९                  ७५           १,५२४           २,६४३          २,८२६
द. कोरिया  १२                ८१६२         ९,७८६          १०,५९१         १०,६९४
(स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटना)

Web Title: CorpnaVirus number of infected people in India increased from 1 to 20000 in 82 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.