CorornaVirus: देशात १४८६ जणांची भर; कोरोना रुग्णांची संख्या २१,३७० वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:58 IST2020-04-23T04:49:37+5:302020-04-23T06:58:51+5:30
कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द

CorornaVirus: देशात १४८६ जणांची भर; कोरोना रुग्णांची संख्या २१,३७० वर
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे १४८६ नवे रुग्ण आढळले असून, याच काळात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २१ हजार ३७० झाली असून, त्यापैकी ४३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत या आजाराने ६८१ जण मरण पावले आहेत आणि १८ हजार ८५९ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. या यात्रेसाठी देशातून लाखो भाविक जात असतात.
सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा
देशव्यापी लॉकडाउनची मुदत ३ मे रोजी संपत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्यात लॉकडाउन सुरू ठेवावा की नाही, यावर ते मते आजमावतील.
बिल गेट्स यांनी केले कौतुक
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
२६,०८,४६२ रुग्ण जगात; १.८१ लाख मृत्यू
जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २५ लाख ८५ हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा १ लाख ८२ हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात ७ लाख १३ हजार ८३० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. अमेरिकेत मृतांचा आकडा ४५ हजारांच्या वर गेला आहे.