CoronaVirus News: ...तर कोरोना पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार; संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:54 AM2021-03-18T10:54:48+5:302021-03-18T10:56:32+5:30

CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; संयुक्त राष्ट्रानं संशोधनानंतर दिला धोक्याचा इशारा

Coronavirus Will Prove To Be Seasonal If It Persists For Many Years says UN | CoronaVirus News: ...तर कोरोना पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार; संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा

CoronaVirus News: ...तर कोरोना पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार; संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा

Next

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातले तब्बल २३ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पुन्हा निर्बंध लागू केले गेले आहेत. काही भागांत लॉकडाऊन करावा लागला आहे. एका बाजूला कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेगदेखील वाढवला जात आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांकडून (UN) दिलेल्या एका गंभीर इशाऱ्यानं सगळ्यांची चिंता वाढली आहे. 

विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढ

कोरोना आता एका हंगामी आजाराच्या स्वरुपात विकसित होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आला दिला आहे. 'कोरोना संकट पुढील काही महिने कायम राहिला, तर मग तो एका हंगामी आजाराच्या रुपात स्वत:ला विकसित करेल. चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीत कोरोनाची लसदेखील आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे,' असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं म्हटलं आहे.

संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार

कोरोना विषाणूनं हंगामी आजाराचं स्वरुप धारण केल्यास बदलणाऱ्या मोसमात लोकांना त्याच्याशी दोन हात करावे लागतील, असा इशारा यूएननं दिला आहे. संघटनेच्या एका टीमनं कोरोनाचा प्रसार आणि त्यासाठी अनुकूल असणारं वातावरण यासंदर्भात अभ्यास केला. यातून कोरोना विषाणू एक हंगामी आजार म्हणून विकसित होऊ शकेल अशी माहिती समोर आली. श्वासाशी संबंधित विषाणूचा प्रादुर्भाव बहुतेकदा हंगामी असतो. अनुकूल वातावरणात असे आजार हातपाय पसरतात, असं निरीक्षण यूएनच्या १६ सदस्यीय टीमनं संशोधनानंतर नोंदवलं.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७ हजार ७४१ जणांनी कोरोनावर मात केली. १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटी १४ लाख ७४ हजार ६०५ पोहोचला आहे. आतापर्यंत १ कोटी १० लाख ६३ हजार २५ जण कोरोनातून बरे झाले असून १ लाख ५९ हजार २१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात २ लाख ५२ हजार ३६४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Coronavirus Will Prove To Be Seasonal If It Persists For Many Years says UN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.