शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 9:06 PM

गेल्या बुधवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका रुग्णालयातील कर्मचारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या हातात सूटकेस पाहून चकित झाले. मग... (chinese corona vaccine)

नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोजच्या रोज दोन लाखहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यामुळे सरकार लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक लोक असेही आहेत, जे भारतात लस घेण्याऐवजी नेपाळमध्ये जाऊन चिनी कोरोना लस घेत आहेत. हे लोक नेमके, असे का करत आहेत, हे जाणून आपणही अवाक व्हाल! (CoronaVirus why the Indian people going to nepal to get chinese corona vaccine)

CoronaVirus Update: धक्कादायक! आरटी-पीसीआर टेस्टनंही डिटेक्ट होईना कोरोना, करावे लागतेय सीटी स्कॅन; लोकांचा दावा

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या बुधवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका रुग्णालयातील कर्मचारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या हातात सूटकेस पाहून चकित झाले. त्यांना शंका आल्यानंतर त्यांनी त्या लोकांकडे ओळख पत्राची मागणी केली. यानंतर या लोकांनी त्यांना भारतीय पासपोर्ट दाखवला. यावर, तेथील कर्मचाऱ्यांनी या लोकांना लस देण्यास नकार दिला. यानंतर, हे लोक तेथेच भांडणावर आले. मात्र, भारत सोडून हे लोक लस घेण्यासाठी तेथे का पोहोचले? याचा खुलासा झाल्यानंतर रुग्णलय प्रशासनालाही मोठा झटका बसला. खरे तर, चिनी दूतावासाने आपल्या वेबसाइटवर चीनमध्ये प्रवेशासाठी जी तरतूद केली आहे, त्यात जे लोक चीनमध्ये तयार झालेली लस घेतली, केवळ त्यांनाच चीनसाठी व्हिसा देण्यात येईल, असे म्हटले आहे. यामुळे जे भारतीय लोक व्यवसाय अथवा इतर काही कामानिमित्त चीनमध्ये जात आहेत, ते लोक चिनी लस घेण्यासाठी नेपाळमध्ये जात आहेत. भारतात चिनी लस वापरण्याची परवानगी नाही. 

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...! बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूच्या टेकू रुग्णालयाचे संचालक सागर राज भंडारी यांनी म्हटले आहे, की त्यांना यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नव्हते. असे लोक समोर आल्यानंतर, लसीकरणाचा यासाठी दुरुपयोग होत असल्याचे समोर आले आहे. कारण हे लोक कोरोनापासून बचावासाठी नाही, तर चीनमध्ये जाण्यासाठी लस घेत आहेत.  यावर नेपाळच्या अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे, की चिनी कंपन्यांसोबत व्यापार करणारे भारतीय व्यापारी आपल्या कर्मचाऱ्यांना चीनमध्ये पाठविण्यासाठी या प्रकारचा अवलंब करत आहेत. यामुळेच ते केवळ चिनी लसच घेऊ इच्छित आहेत. सध्या भारतात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे लसीकरण सुरू आहे. याच बरोबर स्पुतनिक - V या रशियन लशीलाही इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनNepalनेपाळKathmanduकाठमांडू