शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

CoronaVirus: देश दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने? कोणत्या राज्यात काय आहेत निर्बंध? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 4:39 AM

CoronaVirus restrictions: देशातील सर्वाधिक रुग्णवाढीत नाशिक, नागपूर, पुणे, मुंबईचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी असणार आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. दिल्लीत शुक्रवारी रात्रीपासून ५६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा या काळात बंद राहणार आहेत. राजस्थानात शुक्रवारी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.चंदीगडमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू केले आहे. शुक्रवारी रात्री १० पासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अनिवार्य सेवांना यातून सूट आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल हे ५० टक्के लोकांसह चालू राहतील. उत्तर प्रदेश सरकारने रविवारी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. फक्त आवश्यक सेवा सुरू असतील. 

n    देशातील चार शहरांत नव्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दर दहा लाख लोकांमागे नवे रुग्ण वाढत असलेल्या शहरांत नागपूर, पुणे, मुंबई व नाशिक या शहरांचा समावेश आहे. n    गत एक महिन्यातील आकडेवारीवरून हे दिसून आले आहे. तर, टॉप टेनमध्ये दिल्ली, लखनौ, बंगळुरू, भोपाळ, इंदूर, पाटणा यांचा समावेश आहे. १६ मार्च ते १५ एप्रिल या काळात मुंबईत ३.७ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

मुंबईत गेल्या महिन्यात ३.७० लाख रुग्णn    देशातील ज्या शहरात गत महिन्यात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात झाली त्यात नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ, दिल्ली यांचा समावेश आहे. n    नाशिकमध्ये गत महिन्यात ९७,७६५, नागपूरमध्ये १,३४,८४०, पुण्यात २,४७,५२९, मुंबई ३,७०,८९६, लखनौ ४५,१२८, दिल्ली १,४०,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  असे आहेत निर्बंधn    कर्नाटकात राज्य सरकारने सात जिल्ह्यांतील रात्रीची संचारबंदी २० एप्रिलपर्यंत लागू केली. बंगळुरु, मंगळुरु, कालाबुरागी, बीदर, तुमकुरु, उडुपी- मणिपाल येथे हे निर्बंधा लागू असतील.n    पंजाब सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत रात्री ९ ते सकाळी ५ या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शाळा बंद करण्यात आल्या आहेत.n    उत्तराखंडमध्ये रात्री १०.३० ते सकाळी ५ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. बसपासून ते सार्वजनिक वाहनात बसण्याची क्षमता ५० टक्के घटविली आहे. हरयाणात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.n    ओडिशाच्या दहा जिल्ह्यांत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. हे सर्व जिल्हे छत्तीसगडच्या बॉर्डरवरील आहेत. तर सर्व शहरी भागात १७ एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी असेल. केरळमध्येही कोणत्याही समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. n    छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर जम्मू - काश्मिरातील जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग, कुपवाडासह आठ जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी असणाार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या