शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाक्यांमधून निशाणा साधला; 'त्या' संगीतकारानं अप्रत्यक्षपणे पीएम केअर्सचा हिशोबच मागितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 19:33 IST

पीएम केअर्सवरून बॉलिवूड संगीतकाराचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई: कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत असून बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे २३ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात दररोज कोरोनाचे २५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर्स ट्रस्टची स्थापना केली. यामध्ये सढळ हस्ते दान करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं. या आवाहनाला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. यावर आता बॉलिवूडमधील संगीतकार विशाल ददलानीनं भाष्य केलं आहे.  इस्रायलमधील तेल अविव शहरात सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. कोरोना संकटकाळातील चुकीचं व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. त्याचा संदर्भ देत विशाल ददलानीनं मोदी सरकारवर निशाणा साधला. 'लोकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांबाबत विचारणं आता बंद केलं आहे. आपण प्रश्न विचारायला घाबरतो. प्रशासनाकडे आपण उत्तर मागत नाही. आपण गुलामसारखे आहोत आणि मग भारत महासत्ता का झाला नाही, म्हणून विचारणा करतो,' अशा शब्दांत त्यानं देशातल्या स्थितीवर भाष्य केलं आहे. विशालनं काल देशातील कोरोनाच्या स्थितीवरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. 'शेठ देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या. आता 8 लाख झालेत. DJ वाजवून बघूया का..?', असा खोचक सवाल त्यानं विचारला होता. विशालचं हे ट्विट लक्षवेधी ठरलं. जवळपास तीन हजार जणांनी ते लाईक केलं. तर पाचशेहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीVishal Dadlaniविशाल ददलानी