Coronavirus Vaccine : 'सीरम'ची मोठी घोषणा; 'कोविशिल्ड' लसीच्या दरात केली कपात, राज्यांना आधाराचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:17 PM2021-04-28T18:17:47+5:302021-04-28T18:19:03+5:30

यापूर्वी अनेकांकडून लसीचे दर कमी करण्याची करण्यात आली होती मागणी. पाहा काय आहेत नवे दर.

Coronavirus Vaccine: Serum reduced vaccine rates; Information provided by Adar Poonawala | Coronavirus Vaccine : 'सीरम'ची मोठी घोषणा; 'कोविशिल्ड' लसीच्या दरात केली कपात, राज्यांना आधाराचा हात

Coronavirus Vaccine : 'सीरम'ची मोठी घोषणा; 'कोविशिल्ड' लसीच्या दरात केली कपात, राज्यांना आधाराचा हात

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी अनेकांकडून लसीचे दर कमी करण्याची करण्यात आली होती मागणीकेंद्रानं खुल्या बाजारपेठेतही लसींची विक्री करण्याची दिली होती परवागी

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं आता १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारनं लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसींच्या उत्पादनाच्या ५० टक्के इतक्या लसी खुल्या बाजारात विकण्याची परवागी दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु त्यानंतर एकाच लसीचे तीन दर का असा प्रश्न केला जात होता. तसंच राज्यांवरही बोजा पडू नये आणि सामान्यांनाही लस विकत घेता यावी यासाठी लसीचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता सीरम इनस्टिट्यूट ऑफ इंडियानं लसीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. सीरमची कोविशिल्ड ही लस आता ४०० ऐवजी ३०० रूपयांना दिली जाणार असल्याचं अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं.



"सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीं मी लसीचे दर ४०० रूपयांवर ३०० रूपये प्रति डोस इतके कर आहे. तात्काळ प्रभावानं हे दर लागू होतील. राज्यांचा कोट्यवधी रूपयांचा निधी वाचेल. तसंच यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणही होईल आणि अनेकांचे जीवही आपल्याला वाचवता येतील," असं अदर पूनावाला म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणासाठी मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत राज्यांनाही लसीकरणासाठी लसी खरेदी कराव्या लागतील. दरम्यान, यापूर्वी सीरमनं लसीचे दर ४०० रूपये प्रति डोस इतके निश्चित केले होते. परंतु त्यानंतर केंद्र सरकारसाठी, राज्य सरकारसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर वेगळे का असा सवालही करण्यात आला होता. तसंच लसीचे दर कमी करण्याचीही मागणी अनेक स्तरातून करण्यात आली होती. 

Web Title: Coronavirus Vaccine: Serum reduced vaccine rates; Information provided by Adar Poonawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.