शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:20 IST

PM Narendra Modi : लसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी, पंतप्रधानांचं वक्तव्य

ठळक मुद्देलसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी, पंतप्रधानांचं वक्तव्य

"कोरोना विरोधातील लढाईत आपण अनेकांना गमावलं. दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यापूर्वी देशाच्या इतिहासात मेडिकल ऑक्सिजनची गरज कधीही पडली नाही. अनेक जणांना कामाला लावण्यात आलं. कमी वेळात आपण मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन १० टक्क्यांनी वाढवलं. जगाच्या कानाकोपऱ्यातून जसं काही आणता येईल त्याचे प्रयत्न केली. परदेशातून औषधं आणण्यावर कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. आपल्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं होतं. कोरोना विरोधातील लढाईत नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

"या लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे आहे. लसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी आहेत. आज भारतात कंपन्या नसत्या तर काय परिस्थिती उद्भवली असती. पूर्वी लसी आणण्यासाठी दशकांचा काळ लागायचा. हेपिटायटीस, पोलिओ यांसारख्या लसीसाठी दशकांचा वेळ लागायचा. जेव्हा २०१४ मध्ये आम्हाला संधी मिळाली तेव्हा लसीकरणाचं कव्हरेज ६० टक्क्यांच्या जवळ होतं. ज्या प्रकारे लसीकरण सुरू होतं त्याप्रमाणे १०० टक्के लसीकरणासाठी ४० वर्षे लागली असती. यासाठी आम्ही मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. या अंतर्गत लसीकरण केलं जाईल आणि ज्याला गरज असेल त्याला लस दिली जाईल असं ठरवलं. केवळ ७ वर्षांत कव्हरेज ६० टक्क्यांवरून ९० टक्के केलं. आम्ही लसीकरणाची व्याप्ती वाढवली," असं मोदी यावेळी म्हणाले."मुलांच्या संरक्षणासाठी अनेक नव्या लसींचा कार्यक्रम आणला. आम्हाला सर्वांची चिंता होती. आम्ही १०० टक्के लसीकरणाकडे जात होतो तेव्हा कोरोनानं आपल्याला घेरलं. सर्वांसमोर भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कसं वाचवेल असं वाटत होतं. परंतु तेव्हा दृष्टीकोन स्वच्छ असतो तेव्हा सगळं शक्य होतं. एका वर्षात आपण दोन लसी लाँच केल्या. भारत इतर देशांपेक्षा मागे नाही, हे आपण दाखवून दिलं," असं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान