शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

CoronaVirus Vaccine Update : आता भारत कोरोना लशीची निर्यात वाढवणार नाही! देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 08:41 IST

Corona Vaccine Exports: भारतात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ व्हायरला सुरुवात झाली आहे. बुधवारी आलेल्या आकड्यांनुसार, देशात 47 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. यामुळे देशांतर्गत कोरोना लसीची CoronaVirus Vaccine मागणी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने, आता भारत पुढील काही महिन्यांपर्यंत कोविड-19 लसीच्या निर्यातीला आळा घालण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत विविध देशांना दिलेले वचन पूर्ण करेल. मात्र, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील काही महिने निर्यात वाढवणार नाही. (CoronaVirus : India will not allow covid 19 vaccine exports focus on expanding domestic demand)

आतापर्यंत 6 कोटी 4 लाख डोसची निर्यात -या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. गेल्या 20 जानेवारीपासून भारताने परदेशात कोरोना लस पाठवायला सुरुवात केली होती. त्यानुसार, भारताने आतापर्यंत जवळपास 80 देशांना कोरोनाचे 6 कोटी 4 लाख डोस पाठवले आहेत.

Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

भारतात पुन्हा वाढतायत कोरोना रुग्ण -भारतात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ व्हायरला सुरुवात झाली आहे. बुधवारी आलेल्या आकड्यांनुसार, देशात 47 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर 275 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 1,17,34,058 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 3,68,457 रुग्ण सक्रीय आहेत. तर आतापर्यंत एकूण 1,12,05,160 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1,60,441 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला -जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंट्सपेक्षा हा म्युटेशन झालेला विषाणू वेगळा आहे. देशात कोरोना व्हेरिएंटच्या ७७१ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यात ब्रिटनच्या नव्या व्हेरिएंटचे ७३६ बाधित, द. आफ्रिकेच्या व्हेरिएंटचे ३४ आणि ब्राझील व्हेरिएंटचा १ अशा बाधितांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधं