CoronaVirus: us study shows vaccine would prove to be a boon for india against coronavirus vrd | CoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठा प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास

CoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठा प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास

ठळक मुद्देजगभरात दररोज वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं वैज्ञानिकांनाही बुचकळ्यात टाकलं आहे. भारतात बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नसल्याचाही वैज्ञानिकांचा दावा आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(एनआयटी)नुसार, भारतात वाढत चाललेल्या उष्म्यात हा विषाणू फार काळ टिकून राहू शकत नाही.

नवी दिल्लीः जगभरात दररोज वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं वैज्ञानिकांनाही बुचकळ्यात टाकलं आहे. शास्त्रज्ञ आपापल्या परीनं यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नसल्याचाही वैज्ञानिकांचा दावा आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(एनआयटी)नुसार, भारतात वाढत चाललेल्या उष्म्यात हा विषाणू फार काळ टिकून राहू शकत नाही. थंड प्रदेशात हा विषाणू जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे भारतात याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होणार नाही. भारतापेक्षा कोरोना व्हायरसनं स्पेन, इटली आणि अमेरिकेत हाहाकार माजवला आहे.

भारतात हा व्हायरस सिंगल स्पाइक आहे. इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये आढळणारा विषाणू हा ट्रिपल स्पाइक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास भारतात असलेला विषाणू हा नसा किंवा वाहिन्यांवर मजबुतीनं हल्ला करू शकत नाही. तसेच ट्रिपल स्पाइकवाला विषाणू हा नसांना ताकदीनं जखडतो. म्हणून भारताची या व्हायरसपासून मुक्तता होईल, असं समजू शकत नाही. भारतात कुपोषणाची मोठी समस्या आहे. अनेकांना उच्च रक्तदाब, मधुमेह अशा समस्या आहेत. अशा लोकांना या विषाणूची लवकर लागण होते. 

तसेच वैज्ञानिकांच्या मते, टीबी आजाराला रोखण्यासाठी मुलांना बॅसिल कॅलमेट गुयरीन म्हणजेच बीसीजीची लस टोचली जाते. ती लससुद्धा या आजारावर रामबाण ठरत आहे. ब्राझीलमध्ये १९२० आणि जपानमध्ये १९४०पासून या लसीचा वापर केला जातो. या लसीकरणानं माणसाच्या शरीरात टीबीच्या रोगजंतूंची क्षमता कमकुवत होते. त्यामुळेच सृदृढ आरोग्य असलेल्या मनुष्याला कोरोना जास्त जीवघेणा ठरत नाही. या लसीमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्निशियम सॉल्ट, ग्लिसरॉल आणि सायट्रिक ऍसिड असतात.

कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी या लसीचा प्राथमिक टप्प्यात प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. देशातही १९६२मध्ये नॅशनल टीबी प्रोग्रामअंतर्गत ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. याचा अर्थ असा आहे की, भारतातल्या बहुसंख्याकांना ही लच आधीच टोचण्यात आलेली आहे. त्यामुळेदेखील भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार नसल्याचा वैज्ञानिकांना विश्वास आहे. 

Web Title: CoronaVirus: us study shows vaccine would prove to be a boon for india against coronavirus vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.