शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

Coronavirus updates: धोका वाढला! एप्रिलमध्ये आणखी हाहाकार माजवणार कोरोना, फक्त 7 दिवसांत वाढले 66 टक्के रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 2:20 PM

गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर एवढ्या वेगाने पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे पाहता, वॅक्सिनेशन सुरू असतानाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध  होऊ शकते, असे मानले जात आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण देशात हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. आता कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा शिखर गाठताना दिसत आहे. बुधवारी देशात 59 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले. 17 अक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा आकडा असल्याचे समजते. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. यामुळे महामारीचा प्रकोप वाढताना दिसत आहे. (Second wave of Corona virus is more deadly than the first will wreak havoc by the end of april)

गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर एवढ्या वेगाने पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे पाहता, वॅक्सिनेशन सुरू असतानाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध  होऊ शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत संक्रमित रुग्ण संख्या अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. पंजाबचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. येथेही संक्रमितांची संख्या आधीच्या लाटेची सीमारेषा पार करण्यापर्यंत पोहोचली आहे. 

एका आठवड्याची सरासरी 66 टक्क्यांनी वाढली -25 मार्चपर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे, एका आठवड्यात भारतात रोज सरासरी 47 हजार 442 नवे रुग्ण समोर येत आहेत. 28 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच सात दिवसातील सरासरी एवढी अधिक झाली आहे. मात्र, कोरोना प्रसाराचा विचार केला, तर आकडे अणखी भयभीत करणारे आहेत. सात दिवसांपूर्वी, देशातील कोरोना रुग्णांची सात दिवसांतील सरासरी 28 हजार 551 एवढी होती. याचाच अर्थ नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ एका आठवड्यातच 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

दुसऱ्या लाटेत संक्रमणाचा वेग अधिक -गेल्या वर्षीच्या मे महिन्याशी आताच्या स्थितीची तुलना केल्यास मे महिन्यात रोज तीन हजार पाचशे नवे रुग्ण समोर येत होते. मात्र, आता हा आकडा वाढून 47 हजारवर पोहोचला आहे. याचा अर्थ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमणाचा वेग अनेक पटींनी वाढला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या अखेरीस शिखर गाठेल -आकडेवारीचा विचार करता, कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात शिखर गाठेल. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालाचा विचार करता, देशात दुसरी लाट एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च पातळीवर असेल. 15 फेब्रुवारीला सुरु झालेली ही लाट 100 दिवस चालेल. 

अहवालात कोरोनाच्या पहिल्या लाटेतील आकडेवारीसंदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि तामिळनाडूचे प्रदर्शन सर्वात खराब होते. तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमध्ये रोजच्या रोज विक्रमी कोरोना रुग्ण समोर येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल