शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirusupdate : हरिद्वारमध्ये कोरोनाचं तांडव, दर सव्वा मिनिटाला एक संक्रमित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 18:03 IST

येथे कोरोना परिस्थिती भयावह असतानाही, वैष्णव वैरागी अखाडा अखेरच्या कुंभ स्नानासाठी शाही थाटात आणि अंदाजात हर की पैडीला जाण्याच्या तयारीत आहे.

हरिद्वार - कुंभनगरी हरिद्वार येथे कोरोना व्हायरसने कुंभ महापर्वाला ग्रहण लावले आहे. मात्र, अद्यापही चैत्र पौर्णिमेच्या स्नानासाठी येथेच असलेल्या संतांच्या आखाड्यात कोरोना संक्रमण हाताबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत हरिद्वार आणि ऋषिकेशसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे 1175 कोरोनाबाधित समोर आले आहेत. (CoronaVirus update Uttarakhand kumbh haridwar many positive case)

निरंजनी अखाड्याच्या महामंडलेश्वरांचे दिल्लीत निधन झाल्याशिवाय, हरिद्वारमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात आरोग्य विभागाची व्यवस्था कमी पडत आहे. यामुळे शहरात अराजकाची स्थिती आहे. कोणत्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा, हेही लोकांना कळेनासे झाले आहे. 

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

हरिद्वारमध्ये कोरोना हाताबाहेर -येथे कोरोना परिस्थिती भयावह असतानाही, वैष्णव वैरागी अखाडा अखेरच्या कुंभ स्नानासाठी शाही थाटात आणि अंदाजात हर की पैडीला जाण्याच्या तयारीत आहे. अधिकांश शैव अखाड्यांनी आपापल्या पातळ्यांवर कुंभ संपल्याची घोषणाही केली आहे. तसेच शैव साधूंच्या दाहाही आखाड्यांसोबत दोन उदासीन अखाडे आणि शीख साधूंच्या निर्मल अखाड्यांनी तीन शाही स्नान केले आहे. मात्र, 14 एप्रिलला मेष संक्रांतीनिमित्त झालेल्या कुंभमेळ्याच्या तिसऱ्या शाही स्नान होताना कोरोनाचा, असा स्फोट झाला आहे, की परिस्थिती अद्यापही हातात आलेली नाही. येथो कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

दर सव्वा मिनिटाला एक कोरोना रुग्ण -आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीएचआयएलमध्ये  48, शिवालिक नगरात 13, कनखलमध्ये 10, नवोदय स्कूलमध्ये 8, आयआयटी रुडकीमध्ये चार, जूना व निरंजनी अखाड्यात 11 संक्रमित आढळून आले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याभरात 24 तासांत 1175 संक्रमित आढळून आले आहेत. याचा विचार करता दर सव्वा मिनिटाला एक करोना रुग्ण आढळत आहे. सातत्याने येथील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. तसेच यामुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण येत आहे. 

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर, 49 लोकांनी आपला जीवही गमावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत आता राज्य सरकारच्या वतीने येथे कडक नियमावली जारी केली आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णसंख्येत कमी येताना दिसत नाही.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत