शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus: कौतुकास्पद! सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी १००० कुटुंबांना दिलं धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 10:26 IST

त्या गोरगरीब कुटुंबांकडे धान्य घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आता गोरगरिबांना मदत करायची, असा ठाम निश्चय तृतीयपंथीय असलेल्या नूरी कंवरनं केला.  

ठळक मुद्देदेशात लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांवर रोजगार नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी अशाच १००० कुटुंबांना धान्य दिलं आहे. त्या गोरगरीब कुटुंबांकडे धान्य घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आता गोरगरिबांना मदत करायची, असा ठाम निश्चय तृतीयपंथीय असलेल्या नूरी कंवरनं केला.  

नवी दिल्लीः देशात लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांवर रोजगार नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी अशाच १००० कुटुंबांना धान्य दिलं आहे. तृतीयपंथी नूरी कंवरने पुढाकार घेत हे समाजोपयोगी कार्य केलं आहे. एकदा तृतीयपंथीय नूरी कंवरनं शेजारील मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ती तिकडे धावत गेली. त्यावेळी ती आई मुलगा जेवण मागत होता म्हणून त्याला मारत होती. त्या गोरगरीब कुटुंबांकडे धान्य घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आता गोरगरिबांना मदत करायची, असा ठाम निश्चय तृतीयपंथीय असलेल्या नूरी कंवरनं केला.  ७०० गरीब कुटुंबांना दिले जेवणगुजरातमधील बडोदा शहरात राहणा-या नूरीने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात घराजवळ राहणाऱ्या किन्नर सदस्यांना मसूर, पीठ, तांदूळ, साखर, तेल, मसाले इत्यादी पोहोचवलं होतं. याशिवाय नुरीच्या शिष्यांनी ७०० गरीब कुटुंबांच्या घरी शिजवलेले अन्नसुद्धा पुरवलं होतं. इतकेच नव्हे तर नुरीने स्वत: चा आणि आपल्या बहिणींचा फोन नंबर स्थानिक झोपडपट्टीतील लोकांना दिला आणि सांगितले की, जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी अन्न संपेल तेव्हा मला कळवा.सोन्याचे दागिने ठेवले गहाण सर्व मांगलिक कामे आणि रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे तृतीयपंथीयांच्या उत्पन्नावरही गदा आली आहे. परंतु तरीही बडोद्याचा या तृतीयपंथीय समुदाय गरजूंना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नूरी म्हणतात की, त्यांनी लोकांच्या घरात अन्न पोहोचवण्यासाठी सोन्याच्या दागिने गहाण ठेवले. बर्‍याच वर्षांपासून पैसे वाचवताना, स्वत: साठी एक हार बनविला होता, तो तारण ठेवावा लागला आहे. सोन्याचा हार हौसेखातर बनवला होता, पण माझ्याकडे संपूर्ण आयुष्य आहे, त्यामुळे हार कधीही सोडवता येईल. मात्र मला लोकांना उपाशीपोटी मरण्यापासून वाचवायचे आहे.

सामाजिक अंतराचं पालन करणं आवश्यकपास आणि परवान्यांसह रिक्षांच्या माध्यमातून या तृतीयपंथीय समुदायाने गरजू लोकांपर्यंत धान्य आणि जेवण  पोहोचवले. यानंतर रेशन कीट जवळपास 1000 लोकांच्या घराघरात पोहोचत्या केल्या. रेशनिंगचं घरोघरी वाटप करताना सामाजिक अंतरांची नूरी यांनी विशेष काळजी घेतली आहे. नूरी यांनी रस्त्यावर आणि गल्लीत जाऊन रेशनिंग धान्य दारावर ठेवलेलं आहे. जेणेकरून आपल्याला संसर्ग होण्याचा धोका नाही, असंही सांगितलं आहे. देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम देशातील तृतीयपंथीय समुदायावरही दिसून येत आहे, परंतु असे असूनही बडोद्यातील तृतीयपंथीय समाज या संकटकाळात शहरातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

CoronaVirus News: लॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या