CoronaVirus आज ११ वाजता! पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 08:38 IST2020-04-26T08:38:19+5:302020-04-26T08:38:54+5:30
पंतप्रधानांनी यावेळी ग्राम पंचायत स्तरावर चर्चा केल्यानंतर मन की बात ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीवर कॅबिनेट सेक्रेटरींनी राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी बोलून माहिती घेतली आहे.

CoronaVirus आज ११ वाजता! पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. यावेळी त्यांनी देशाला संबोधित करताना तुम्ही असाल तिथेच रहा, अशा सूचना केल्या होत्या. यानंतर तीनवेळा देशाला संबोधित करत अडकलेल्या नागरिकांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला होता. आज पुन्हा मोदी मन की बातमधून देशाला संबोधित करणार आहेत.
कोरोनामुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. अशावेळी सध्याची देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता हाल लॉकडाऊन आणखी वाढविण्यासाठी नागरिकांचा सहयोग मागण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी यावेळी ग्राम पंचायत स्तरावर चर्चा केल्यानंतर मन की बात ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीवर कॅबिनेट सेक्रेटरींनी राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी बोलून माहिती घेतली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला कोरोना व्हायरसबाबत माहिती देऊन त्यांच्या सहकार्याची स्तुती करू शकतात. तसेच कोरोना वॉरिअर्स म्हणजेच डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आवाहनही करू शकतात.
जनतेकडून सूचना मागवलेल्या
पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी लोकांकडून सूचना मागविलेल्या होत्या. १२ एप्रिलला त्यांनी ट्विट करून आजच्या मन की बातची माहिती दिली होती. MyGov आणि NaMo अॅपवर या सूचना द्यायच्या होत्या.