शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: हैदराबादहून रेमडेसिवीरची साडेतीन हजार इंजेक्शन मुंबईत; आजपासून उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 06:36 IST

उद्यापासून या इंजेक्शनचे वाटप मागणीनुसार रुग्णालयात करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबई : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमेडेसीवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. मुंबई महापालिकेने तुटवडा होण्यापूर्वीच हैदराबादमधील एका औषध उत्पादक कंपनीला १५ हजार इंजेक्शनची आॅर्डर दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३ हजार ५०० हून अधिक इंजेक्शन हैदराबादवरून रविवारी रात्री विमानाने मुंबईत पोहोचणार आहेत.उद्यापासून या इंजेक्शनचे वाटप मागणीनुसार रुग्णालयात करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. कोरोना रुग्णांवर रेमेडेसीवीर प्रभावी ठरत आहे. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशात या इंजेक्शनचा वापर वाढला आहे. त्यामुळे मागणी ही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील काही कंपन्याना या इंजेक्शनच्या उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. यात हैदराबादमधील हेट्रो हेल्थ केअर कंपनीचाही समावेश आहे. त्यानुसार पालिकेने या कंपनीकडून इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.सध्या या इंजेक्शनचा तुटवडा नाही. या एका इंजेक्शनची किंमत ५,४०० रुपये आहे. पण १५ हजार इंजेक्शन थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ते ४,१४४ रुपयांना उपलब्ध झाल्याचे काकाणी यांनी सांगितले.मुबलक साठा असल्याचा एफडीएचा दावाकोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडेसीवीर या औषधांचा तुडवडा असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर, काही डॉक्टर-रुग्णालयाकडूनही खासगीत औषध मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए)मात्र मुंबईसह राज्यात कुठेही या औषधाचा तुडवडा नसल्याचा दावा केला आहे. तर, रेमेडेसीवीरचा मुबलकसाठा उपलब्ध असल्याचे म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांनी काही अडचण आल्यास संपर्क करावा असे आवाहनही एफडीएचे सहआयुक्त (औषध), मुख्यालय जुगल किशोर मंत्री यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस