शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बापरे! बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी, 3000 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 11:35 IST

Coronavirus : पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे.

मदूराई - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 12,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक तामिळनाडूमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.

तामिळनाडूच्या मदुराईमध्ये बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मदुराईतील एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक उपस्थित होते. याप्रकरणी लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या तब्बल 3 हजार लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी जमली होती. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत सुमारे दोन लाख एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तर दीड लाखाहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांना 100 रुपये दंड आकारला जाईल आणि त्याचप्रमाणे वाहनचालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 99 जणांचा तर देशात 37 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!

Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्... 

Coronavirus  : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसDeathमृत्यू