Coronavirus: कोरोनाची दहशत! मुलीने वृद्ध माता-पित्याला घरातून काढले तर घरमालकानेही वाऱ्यावर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:49 PM2020-04-02T12:49:03+5:302020-04-02T12:51:18+5:30

कोरोनाच्या दहशतीमुळे प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागला आहे.

Coronavirus: The terror of Corona! Daughter Expels Elderly Parents From Home pnm | Coronavirus: कोरोनाची दहशत! मुलीने वृद्ध माता-पित्याला घरातून काढले तर घरमालकानेही वाऱ्यावर सोडले

Coronavirus: कोरोनाची दहशत! मुलीने वृद्ध माता-पित्याला घरातून काढले तर घरमालकानेही वाऱ्यावर सोडले

Next
ठळक मुद्देभारतात कोरोना रुग्णांची संख्या २ हजारांच्या वर पोहचली आहेकोरोनाच्या धास्तीने प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहतोयदिल्लीत मुलीने आई-वडिलांना घरातून जाण्यास सांगितले.

कानपूर – देशात वाढणारा कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगच आवाहन केलं आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात येऊ नये यासाठी काळजी घेण्यास सांगितली आहे. मात्र देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे.

कोरोनाच्या दहशतीमुळे प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागला आहे. बाहेरुन येणारे आई-वडील, भाऊ-बहिण सर्व नातेवाईकांकडे संशयाने पाहिलं जात आहे. औरेया येथे एका मुलीने आपल्या वृद्ध आईवडील, दादा-वहिनीला घरी जाण्यास सांगितले. संपूर्ण कुटुंब दिल्लीहून आलं होतं. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची भीती मुलीला होती.

त्यानंतर दोन दिवसांपर्यंत या कुटुंबाने घराच्या गच्चीवर वास्तव्य केले. आता आसपासची लोकही त्यांचा विरोध करायला लागले आहेत. मात्र आमची तपासणी झाली आहे आम्ही पूर्णपणे ठीक आहोत असं या कुटुंबाने वारंवार लोकांना सागितलं तरीही लोक ऐकण्यास तयार नाहीत. चौबेपूर येथे राहणारे राजेंद्र संपत्ती विकून अनेक वर्षापासून दिल्लीतल्या बदरपूर येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांचा मुलगा जितेंद्रकुमार डीटीसी बसमध्ये चालक आहे.

५ मार्च रोजी जितेंद्र कुमार आई शिवसखी, वडील, पत्नी अंजली आणि मुलासह औरेया येथे राहणारी बहीण दीपमाला हिच्या घरी गेलो होतो. याठिकाणी आम्ही काही दिवस थांबलो त्यादरम्यान लॉकडाऊन झाला. जितेंद्रला दिल्लीतील घरमालकाचा फोन आला त्याने सांगितले आता तो रूम भाड्याने देऊ शकत नाही. सोमवारी बहीण दीपमालाने कोरोनाच्या भीतीने आम्हाला जाण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही मंगळवारी मंधना येथे पोहचलो. त्याठिकाणीही लोक आधीपासून भाड्याने राहत होते. घरमालकाने रुम खाली होत नाही सांगून आम्हाला घराच्या गच्चीवर राहण्यास सांगितले.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: The terror of Corona! Daughter Expels Elderly Parents From Home pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app