शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : तिसऱ्या लाटेचा इशारा अतिशय गांभीर्याने घ्या; केंद्रानं व्यक्त केली नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 05:56 IST

Coronavirus Third Wave : नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, केंद्र सरकार नाराज. कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे लव अग्रवाल यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देनागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, केंद्र सरकार नाराज.कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे लव अग्रवाल यांचं वक्तव्य.

नवी दिल्ली : जगात कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. भारत सरकारनेही देशात तिसऱ्या लाटेचा धेाका असल्याचा इशारा सातत्याने दिला आहे. मात्र, लोकांकडून तो गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या सूचनेप्रमाणे लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी नागरिकांना गाफील न राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, बाजारपेठा, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी लोकांकडून कोरोना नियमावलीचे पालन होताना दिसत नाही. आम्ही तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहोत. मात्र, लोक त्याकडे हवामान खात्याच्या एखाद्या अपडेटप्रमाणे पाहत आहेत. याचे गांभीर्य लोकांना नसल्याबद्दल अग्रवाल यांनी खंत व्यक्त केली. कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. निती आयाेगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, जगात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मात्र, भारतात ती येऊ नये यासाठी लोकांना गंभीर्याने प्रयत्न करावे लागतील. 

चार राज्यांमध्ये ७३ टक्के नवे रुग्ण  जुलैमध्ये नव्या रुग्णांपैकी सुमारे ७३.४ टक्के रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आढळल्याची माहिती केंद्राने दिली आहे. १३ जुलैला संपलेल्या आठवड्याअखेर भारतातील ५५ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरसह १० राज्यांमध्ये केंद्रीय पथक मदतीसाठी पाठविण्यात आली होती.

धडकी भरविणारी छायाचित्रेदेशभरात बाजारपेठा तसेच थंड हवेच्या पर्यटन स्थळांवर लोकांनी प्रचंड गर्दी केली. पर्यटन स्थळांवर लोकांच्या प्रचंड गर्दीची धडकी भरविणारी छायाचित्रे व्हायरल झाली होती. ती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती.

‘डेल्टा व्हेरियन्ट’च्या रुग्णांमुळे धोका कायमकोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियन्ट’चे रुग्ण महाराष्ट्रातही आढळले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच हे रुग्ण इतर राज्यांतही आढळून येत आहेत. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहेत. मात्र, धोका टळलेला नाही. केरळमध्ये ‘झिका’ विषाणूचे रुग्णही वाढत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यMarketबाजारweatherहवामान