coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:20 PM2020-05-23T13:20:08+5:302020-05-23T13:28:31+5:30

गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

coronavirus: stale food, no water in toilet in Shramik Express BKP | coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

coronavirus: खायला शिळे अन्न, शौचालयात नाही पाणी, ट्रेनला १०-१० तास सिग्नल नाही, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे हाल

Next
ठळक मुद्देदेशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेतप्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव श्रमिक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी केला आरोप

लखनौ - संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे निर्माण झालेली दहशत आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे शहरात वास्तव्य करणारे लाखो मजूर गावच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. मिळेल त्या वाहनाने नाहीतर पायी गावाच्या दिशेने निघालेल्या या मजुरांचे तांडे आणि त्यांच्या व्यथा ऐकून सर्वसामान्यांचे मन हेलावत आहे. या मजुरांचे हाल कमी करण्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

देशाच्या विविध भागांतून सुटत असलेल्या श्रमिक ट्रेन प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी तासनतास थांबवून ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ट्रेनमधील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान, खाण्यासाठी शिळे अन्न दिले जात असल्याचा तसेच डब्यातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव असल्याचा आरोप या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम येथून निघालेली एक ट्रेन दीनदयाल उपाध्याय स्टेशनच्या आउटर सिग्नलवर तब्बल १० तास थांबवून ठेवण्यात आली होती. येथे रात्री ११ वाजता आलेली ही ट्रेन १० तास थांबवून ठेवण्यात आली, असा आरोप या ट्रेनमधून प्रवास करत असलेला प्रवासी धीरेन राय याने केला.

 अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पनवेल येथून जौनपूरसाठी निघालेली एक ट्रेन वाराणसी येथे १० तास उभी करून ठेवण्यात आली. त्यानंतर या ट्रेनमधील प्रवाशांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या गोविंद राजभर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आपल्याला एकदा भोजन देण्यात आले. मात्र नंतर उत्तर प्रदेशमध्ये काहीच मिळाले नाही. ट्रेन काशी येथे ७ तास थांबवण्यात आली. त्यानंतर काही अंतर कापल्यावर अजून दोन तास ट्रेन थांबवली गेली. त्यानंतर तिसऱ्यांना ट्रेन पुढे सरकली आणि पुन्हा थांबली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज  

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती  

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली

तर गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या एका ट्रेनमध्ये कानपूर येथे देण्यात आलेले भोजन मजुरांनी फेकून दिले. हे भोजन शिळे असल्याचा आरोप मजुरांनी केला. तसेच ट्रेनमधील डब्यातील शौचालयात पाणीसुद्धा उपलब्ध नसल्याचे मजुरांनी सांगितले.

Web Title: coronavirus: stale food, no water in toilet in Shramik Express BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.